TRENDING:

Pune News : एक वही एक पेन उपक्रमाची सर्वत्र चर्चा, पुण्यातील हा उपक्रम नेमका आहे तरी काय?

Last Updated:

या मंडळाने गेल्या चार वर्षापासून उपक्रम सुरू केला आहेएक वही एक पेन येणाऱ्या भाविकांकडून फुलहार न स्वीकारता  त्यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी एक वही एक पेन  नैवेद्य म्हणून अर्पण करण्याचे आव्हान केले जाते. यामधून जवळपास 1000 च्या संख्येने वही पेन हे जमा होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्राची केदारी, प्रतिनिधी
advertisement

पुणे : समाजात जणजागृती करण्यासाठी गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी 1894 मध्ये केली आणि मागील काही वर्षात या उत्सवाचे स्वरूपात बदलेले पाहायला मिळत आहे. अनेक मंडळ हे वेगवेगळे उपक्रम राबवत सामाजिक भान जपत असतात. पुण्यातील एका मंडळाने असाच एक कौतुकास्पद उपक्रम राबवला आहे.

पुण्यातील सहकार नगरमधील एकता मित्र मंडळाने पुढे येत मागील 4 वर्षांपासून एक अनोखा उपक्रम राबवत आहोत. या मंडळाच्या वतीने एक वही एक पेन हा उपक्रम राबवला जात आहे. नेमकी ही संकल्पना काय आहे, या विषयीची माहिती जाणून घेऊयात.

advertisement

या मंडळाने गेल्या 4 वर्षापासून उपक्रम सुरू -

येणाऱ्या भाविकांकडून फुलहार न स्वीकारता त्यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी एक वही एक पेन नैवेद्य म्हणून अर्पण करण्याचे आव्हान केले जाते. यामधून जवळपास 1000 च्या संख्येने वही पेन हे जमा होत आहेत. यामधून नक्कीच शाळकरी मुलांना फायदा हा होत आहे.

वकील झाली तरी कोर्टाची पायरी चढली नाही; अलिबागमधील 24 वर्षीय तरुणी बनली यशस्वी व्यावसायिक, VIDEO

advertisement

विद्येची देवता म्हणून गणपतीची पूजा केली जाते. गणपतीसाठी फुल, हार, नारळ हे आपण अर्पण करत असतो. ते जितके गरजेचे तेच लक्षात घेऊन एक वही एक पेन हा उपक्रम मागील 4 वर्षांपासून राबवण्यात येत आहे. आजच्या काळात शिक्षणाला खूप महत्त्व आहे, ते लक्षात घेत येणाऱ्या भाविकांनी बाप्पाच्या दर्शनाला येताना फुलहार न आणता नागरिकांनी येताना एक वही एक पेन आणावा.

advertisement

नमो शेतकरी महासन्मान योजना : सोलापुरात इतक्या शेतकऱ्यांनी घेतला लाभ, VIDEO

हे सर्व साहित्य जे आहे, ते ग्रामीण भागातील तसेच वस्ती पातळीवरील जी मूल आहे, त्यांच्यापर्यंत हे साहित्य पोहचवले जाते. तर एकूण संपूर्ण गणेश उत्सवात 80 डझन वह्या, पेन हे जमा झाले आहेत. नागरिकांचा या उपक्रमाला चांगला प्रतिसादही मिळत आहे. सुरुवातीला लोकांचा अगदी कमी प्रतिसाद होता. मात्र, आता लोक स्वतः येत हे वही पेन देत आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सुधीर ढमाले यांनी दिली. त्यांचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune News : एक वही एक पेन उपक्रमाची सर्वत्र चर्चा, पुण्यातील हा उपक्रम नेमका आहे तरी काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल