जीएसटीचा फायदा थेट ग्राहकांना; वाहन खरेदीत मोठी वाढ
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमती कमी झाल्या असल्याने नागरिकांनी खरेदीकडे अधिक उत्साहाने धाव घेतली आहे. दसरा, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज या शुभ मुहूर्तांवर लोकांना नवीन वाहन खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे या काळात शो-रूम आणि आरटीओ कार्यालयात खरेदीदारांची मोठी गर्दी दिसली.
advertisement
या आठ दिवसांत झालेल्या नोंदणीत सर्वाधिक म्हणजे 8 हजार 763 दुचाकींची नोंदणी झाली आहे. गेल्यावर्षी ही संख्या 7 हजार 911 होती. त्यानंतर 2 हजार 786 कार, 546 रिक्षा, 471 टॅक्सी, 635 मालवाहतूक वाहने आणि 42 बस अशी नोंदणी झाली आहे. इतर श्रेणीतील वाहनांची संख्या 144 इतकी होती.
साधारण पाहता या आकडेवारीवरून दिसून येते की पुणे आणि परिसरात दरवर्षी वाहन खरेदीत एक ते दीड हजारांची वाढ होत आहे. लोक नवीन वाहन खरेदी करण्यासाठी शुभ दिवसाची वाट पाहतात आणि त्याच दिवशी वाहन नोंदणी पूर्ण करून ते घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. यंदाची दिवाळी वाहन विक्रेत्यांसाठीही फायद्याची ठरली आहे. वाहन बाजारात पुन्हा एकदा चैतन्य परतले असून पुढील काही दिवसांतही ही वाढ कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.