पायलट ते खासदार...
जन्म 1 मे 1944 रोजी झाला असून, राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी भारतीय हवाई दलात 6 वर्षांहून अधिक काळ पायलट म्हणून काम केले होते. हवाई दलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. ते पुण्याचे खासदार म्हणून दीर्घकाळ कार्यरत होते आणि त्यांनी पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये रेल्वे राज्यमंत्री म्हणूनही पद भूषवलं होतं. विशेष म्हणजे, रेल्वे राज्यमंत्री असताना रेल्वे बजेट मांडणारे ते एकमेव राज्यमंत्री ठरले होते. पुण्यात 'पुणे फेस्टिव्हल' आणि 'पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन' यांसारख्या उपक्रमांची सुरुवात करून त्यांनी शहराला एक नवी ओळख मिळवून दिली.
advertisement
पुण्याचे कारभारी...
पुणे शहराच्या विकासासाठी, विशेषतः विमानतळ विकास, मेट्रो प्रकल्प आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये त्यांचा मोठा हात होता. त्यांच्या याच राजकीय वर्चस्व, प्रशासकीय पकड आणि विकासकामांच्या जबाबदारीमुळे त्यांना पुण्याचे 'कारभारी' म्हणून ओळखले जाऊ लागले, जणू ते शहराचे व्यवस्थापकच आहेत. क्रीडा प्रशासन: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनात त्यांची भूमिका आणि त्यानंतरचे वाद यामुळेही ते चर्चेत होते, पण पुण्याच्या संदर्भात त्यांची 'कारभारी' ही उपाधी स्थानिक राजकारणातून आली होती.
भ्रष्टाचाराचे आरोप अन् क्लिन चीट
1996 ते 2011 पर्यंत त्यांनी भारतीय ऑलिंपिक संघ (IOA) चे अध्यक्ष पद सांभाळले. या भूमिकेतून त्यांनी भारतात अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन आणि नियोजन केले. 2010 मध्ये दिल्ली येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (CWG) आयोजक समितीचे अध्यक्ष म्हणून कलमाडी होते. या स्पर्धेच्या खर्च आणि कंत्राटांमध्ये अधिक खर्च, अनुचित व्यवहार आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. 25 एप्रिल 2011 रोजी सीबीआयने कलमाडी यांना भ्रष्टाचार आणि साजिश (IPC 120B, 420) अंतर्गत अटक केली. मनी लाँडरिंगशी संबंधित आरोपांवरून ईडीने स्वतंत्र तपास सुरू केला. या तपासातही पुरावे पुरेसे नसल्यामुळे 2025 मध्ये ईडीने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आणि न्यायालयाने तो स्वीकारला.
कलमाडी यांचे राजकीय अस्तित्व या प्रकरणानंतर काही काळासाठी कमी झाले, पण 2025 मधील क्लोजर निकालामुळे पुन्हा एकदा त्यांची प्रतिमा चांगली होऊ लागली. काही महिन्यांपूर्वी त्यांनी पुणे महापालिकेत दिलेली भेट ही चर्चेचा विषय ठरली होती.
