TRENDING:

1 एकरापासून सुरुवात, आज 9 एकरापर्यंत पोहोचली, पुण्यातील राईज अँड शाईनच्या मदतीने शेतकऱ्यानं केली कमाल!

Last Updated:

रामचंद्र सावे हे पूर्वीपासूनच पारंपरिक भाजीपाल्याची शेती करत होते. परंतु त्यामध्ये तेवढं उत्त्पन्न होत नव्हतं. तर कधी कधी वातावरणातील बदलामुळे नुकसानही होत होतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्राची केदारी, प्रतिनिधी
advertisement

पुणे : शेतात आता शेतकरी नवनवीन प्रयोग करत आहेत. त्या माध्यमातून ते आता चांगले उत्पन्नही घेत आहेत. त्याचप्रमाणे एका शेतकऱ्याने आपल्या 9 एकर शेतीत ऑर्किड फुलांची शेती केली आहे. आज जाणून घेऊयात, ही विशेष कहाणी.

रामचंद्र रघुनाथ सावे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते पालघर जिल्ह्यातील डहाणु तालुक्यातील चिंचणी गावातील रहिवासी आहे. त्यांनी प्रसिध्द फुल शेतीतज्ञ आणि पुण्यातील राईज अँन शाईनच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. भाग्यश्री पाटील यांच्या मदतीने आपल्या नऊ एकर शेतात ऑर्किड फुलांची शेती केली आहे.

advertisement

जिद्द, चिकाटीच्या जोरावर तरुणाने उभारला फॅब्रिकेशनचा उद्योग, सोलापूरच्या रहिमानची प्रेरणादायी गोष्ट!

View More

1 एकरापासून ते 9 एकरांपर्यंत -

रामचंद्र सावे हे पूर्वीपासूनच पारंपरिक भाजीपाल्याची शेती करत होते. परंतु त्यामध्ये तेवढं उत्त्पन्न होत नव्हतं. तर कधी कधी वातावरणातील बदलामुळे नुकसानही होत होतं. तेव्हा त्यांना शेताकडे येत असताना नैसर्गिक आर्किड दिसले आणि त्यांनी याची शेती करण्याचा विचार केला. त्यानंतर त्याचे प्रशिक्षण घेत त्यांनी आर्किडच्या शेतीला सुरुवात केली. यामध्ये एक एकरात लागवड केल्यानंतर त्यामधून चांगले उत्पन्न  मिळालं. मग पुढे त्यांनी 2 एकरात त्याची लागवड केली. यासाठी 70 लाख रुपये इतका खर्च झाला. मग पुढे यामधून मिळणाऱ्या पैशातून अजून वाढवत आता 9 एकरात त्याची लागवड केली आहे.

advertisement

तरुणीसांठी सुवर्णसंधी, याठिकाणी फक्त 150 ते 200 रुपयांना मिळतात स्पेशल कुर्ती, तब्बल 10 प्रकारच्या variety, हे आहे लोकेशन?

यासाठी सॉईल वॉटर वापरलं जातं. यामध्ये क्षार आहेत. त्यामधून पानावर पपुद्रा तयार केला जातो. त्यानंतर त्याची लागवड केली जाते. पुण्यातील राईज अँन शाईनच्या माध्यमातून बँकॉकला जाऊन तिथं कशा पद्धतीने याची शेती होते, याचा अभ्यास करून हळूहळू यात वाढ केली. आता ते 9 एकरात याची शेती करत आहेत. त्यासाठी मजूरही कमी लागतात.

advertisement

एक व्यक्ती एक एकर सांभाळू शकतो. आर्किड हा असा प्रोजेक्ट आहे की, जो तरुण वर्गाने केला पाहिजे. यामधून 5 ते 6 वर्ष उत्पन्न हे घेऊन चांगला नफाही मिळवू शकता. शेडनेटमध्ये ही फुलांची शेती केली आहे. आता या ऑर्किडला बाजारात चांगली मागणी मिळत आहे, अशी माहिती रामचंद्र सावे यांनी दिली.

मराठी बातम्या/पुणे/
1 एकरापासून सुरुवात, आज 9 एकरापर्यंत पोहोचली, पुण्यातील राईज अँड शाईनच्या मदतीने शेतकऱ्यानं केली कमाल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल