दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव मंडपात मंगलमूर्ती तृतीय पंथी चॅरिटेबल ट्रस्ट च्या तृतीयपंथी महिला सदस्यांनी आरती केली.यावेळी अनेक तृतीयपंथी सदस्या हजर होत्या. समाजसेवेला आणि सांस्कृतिक संवर्धनाला कृतिशील हातभार लावणारी एक महत्त्वाची संस्था असा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा लौकिक आहे.
गणपती बाप्पा पावला! नारळाच्या मागणीत वाढ झाल्यानं विक्रेत्यांना अच्छे दिन
advertisement
दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील तृतीयपंथी महिला सदस्यांनी श्रीमंत दगडूशेठ बाप्पाची आरती केली. आम्ही या ठिकाणी बाप्पाचं दर्शन घ्यायला येत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. चांद्रयान 3 च्या यशाबद्दल देशाचा अभिमान वाटतो, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्याचबरोबर महराष्ट्रात भरभरुन पाऊस पडू दे अशी प्रार्थना बाप्पाला केल्याचं त्यांनी सांगितलं.
पुण्यात चक्क सोन्या-चांदीचे मोदक? गणेशोत्सवात चितळेंच्या प्रयोगाची होतेय चर्चा
यापूर्वी थायडलंडमधील बँकॉकमधून गणेशभक्तांनी दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. त्यांनी यावेळी बाप्पाची मनोभावे आरती देखील केली. सकोन्लत आणि रोमलूक या बँकॉकमध्ये हॉटेल व्यावसायिक अदाम्पात्यानं ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ या जयघोषात त्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं. गणपती बाप्पावर आमची मोठी श्रद्धा आहे. आमच्या सर्व मनोकामना बाप्पांनी पूर्ण केल्या आहेत. गेल्या 10 वर्षांपासून आम्ही बाप्पाच्या भेटीसाठी आतूर होतो. यावर्षी आमची इच्छा पूर्ण झाली. त्यामुळे आम्ही आनंदी आणि समाधानी आहोत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.