हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या पेशंट्सना ते आहेत त्या विभागामध्ये, त्यांच्या खाटेवर बसून 'दगडूशेठ' गणपतीचे दर्शन घेत आरती करण्याचा आनंद देण्याची सुविधा 'व्हर्च्युअल रिअॅलिटी' च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
काय आहे सुविधा?
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ट्रस्टच्या १३१ व्या वर्षी गणेशोत्सवानिमित्त 'व्हर्च्युअल रिअॅलिटी स्टार्टअप - डिजिटल आर्ट व्हीआरई' या माध्यामातून पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयातील आयसीयू मधील रुग्णांना बाप्पाचे दर्शन दिले जात आहे. डिजिटल आर्ट व्हीआरई चे संस्थापक संचालक अजय पारगे यांची ही संकल्पना आहे.
advertisement
नितीन चंद्रकांत देसाईंची अनोखी संकल्पना, आता पुण्यातच होणार चारधाम यात्रा
'व्हर्च्युअल रिअॅलिटी' ते रुग्ण प्रत्यक्षपणे उत्सवमंडपात आहेत आणि गणरायाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होत असल्याचा भास त्यांना होत आहे. अयोध्या श्रीराम मंदिरात गणरायाचे दर्शन घेण्याचा अनुभव रुग्णांनी घेतला. तसेच गुरुजींसोबत आरती करीत असल्याचा आनंद देखील रुग्णांना मिळत आहे. या दर्शनाचा आनंद घेताना अनेक रुग्णांना आनंदाश्रू अनावर झाले. आपण लवकर बरे व्हावे, यासाठी रुग्णांनी प्रार्थना देखील केली.
गणपती बाप्पा मेटाव्हर्समध्ये असतील आणि आरोग्याच्या स्थितीनुसार काही रुग्ण आभासी माध्यमाद्वारे बाप्पासमोर उभे राहून आरती करू शकतील. हे रुग्ण इतर भक्तांच्या शेजारी उभे राहून जप करताना आणि अभिषेक करतानाही पाहतील. त्यामुळे त्यांना बसल्याजागी बाप्पासाठी केलेली सजावट आणि प्रत्यक्ष दर्शन घेण्याचा अनुभव मिळणार आहे, अशी माहिती अजय पारगे यांनी दिली.
पितृपक्षात श्राद्ध करणे शक्य नसेल तर घरच्या घरी करा ‘हे’ उपाय
'व्हर्च्युअल रिअॅलिटी' द्वारे दगडूशेठ बाप्पाचे दर्शन घेण्याची संधी रुग्णांना उपलब्ध होत आहे. यामुळे रुग्णांना वेगळी उर्जा आणि समाधान मिळणार असून बाप्पाचा हा दर्शनरुपी प्रसाद, ट्रस्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. कोव्हिड काळात या उपक्रमाला प्रारंभ झाला. तेव्हापासून सातत्याने आम्ही हा उपक्रम ससूनसह वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये राबवित आहोत. त्याला रुग्णांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी दिली.





