TRENDING:

Pune Gaja Marne : पुण्यात कुख्यात गुंड गजा मारणेचा VIDEO व्हायरल, पुणे पोलिसांचे आदेश धाब्यावर

Last Updated:

काहीच महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांनी सगळ्या गुंडांची परेड घेतली होती. तसंच गुन्हेगारी कारवाया थांबवण्याचं आणि गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण करू नये, असा सज्जड दमच पुणे पोलिसांनी या गुंडांना दिला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : काहीच महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांनी सगळ्या गुंडांची परेड घेतली होती. तसंच गुन्हेगारी कारवाया थांबवण्याचं आणि गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण करू नये, असा सज्जड दमच पुणे पोलिसांनी या गुंडांना दिला होता. अशा कृत्यांमध्ये सापडल्यास कडक कारवाईचा इशाराही पुणे पोलिसांनी दिला होता. पण पुण्यातल्या कुख्यात गुंड गजा मारणेकडून मात्र या आदेशाला धाब्यावर बसवण्याचे प्रकार सुरू आहेत.
News18
News18
advertisement

गजा मारणे आणि त्याच्या गँगमधल्या मुलांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये गजा मारणे काही दुचाकींसमोर नारळ फोडत आहे, तसंच या दुचाकींची पूजा करत आहे. या व्हिडिओमध्ये गजा मारणेचे समर्थक नंबर प्लेट नसलेल्या या मोठ्या आवाजाच्या दुचाकी चालवताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात सुधारणा, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

पुण्यामध्ये काही महिन्यांपूर्वी शरद मोहोळची हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर नुकताच पदभार स्वीकारलेल्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यातल्या 267 गुंडांना पोलीस आयुक्तालयामध्ये बोलावलं आणि त्यांना गुन्हेगारीचं उदात्तीकरण न करण्याचा दम भरला. पुणे पोलिसांनी घेतलेल्या या परेडमध्ये स्वत: गजा मारणेही उपस्थित होता. याशिवाय निलेश घायवळ, बंडू आंदेकर, बाबा बोडके यांच्यासह इतर गंभीर गुन्हे दाखल असलेले गुंडही होते.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune Gaja Marne : पुण्यात कुख्यात गुंड गजा मारणेचा VIDEO व्हायरल, पुणे पोलिसांचे आदेश धाब्यावर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल