समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील जेधे चौक आणि पूरम चौकात ढोल-ताशा आणि डिजे वाजवण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जेधे चौकातील 5 तर पूरम चौकातील मंडळांनी 4 तासात मिरवणूक संपवावी यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. दरवर्षी गणेश विसर्जनाच्या दिवशी जेधे चौक आणि पूरम चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळते. या दोन्ही चौकातून सुमारे 205 गणेश मंडळ जातात. त्यामुळे अनेक गणेश मंडळांच्या मिरवणुकांना या ठिकाणी कित्येक तास थांबावे लागते.
advertisement
Ganeshotsav 2025: बाप्पा महागला! गणेश मूर्तींच्या किमती 30 ते 40 टक्क्यांनी वाढल्या
काय आहेत उपाययोजना?
परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्यासह टिळक रस्ता गणेश विसर्जन समितीच्या आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी केली. जेधे चौक आणि पूरम चौक येथे ढोल-ताशा आणि डिजे वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. जेधे चौकातील मंडळांनी 5 तासात तर पूरम चौकातील मंडळांनी 4 तासात मिरवणूक संपवावी, अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
टिळक रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीत काही निवडक ढोल ताशा पथकांना सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली आहे. पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यानुसार विसर्जन मिरवणुका रात्री 12 वाजेपर्यंत संपवण्याचा प्रयत्न गणेश मंडळ आणि पोलीस प्रशासन करणार आहे.






