सुरुवातीला त्याने त्याच्यावर असणाऱ्या कर्जामुळे अशाप्रकारे कड्यावरून बेपत्ता होण्याचा बनाव रचला असावा, असा संशय व्यक्त केला गेला. याबाबतचा एका सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आल्यामुळे हा सगळा बनाव असावा, असा संशय गडद झाला. पण सिंहगडावर गौतमसोबत काय घडलं? याची सगळी स्टोरी आता समोर आली आहे. स्वत: गौतम याने त्याच्यासोबत नेमकं काय घडलं? याची माहिती दिली आहे.
advertisement
नेमकं काय घडलं?
हैदराबादहून पुण्यात फिरायला आलेल्या गौतम गायकवाडने एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "मी मित्रांसोबत सिंहगडावर फिरायला गेलो होतो. यावेळी लघुशंका आल्याने मी बाजुला गेलो. तेव्हा तानाजी कड्याजवळ मला एका ठिकाणी कुत्रा अडकलेला दिसला. त्याला वाचवण्यासाठी मी खाली उतरलो, पण त्याचवेळी माझा पाय घसरला आणि मी दरीत पडलो. दरीचा कडा असल्याने मला वरती चढता आले नाही. मी मदतीसाठी ओरडण्याचा खूप प्रयत्न केला, पण सतत पाऊस सुरू असल्याने माझा आवाज कोणापर्यंतच पोहोचला नाही." असे गौतमने सांगितले.
पाच दिवस उपाशी आणि तहानलेला
गौतम दरीत एका ठिकाणी थांबला आणि तिथेच त्याला झोप लागली. जाग आल्यावर त्याला काहीच दिसत नव्हते. तो हळूहळू पुढे सरकत गेला. जवळपास पाच दिवस त्याला अन्न किंवा पाणी मिळाले नाही. अखेर पाच दिवसांनी त्याला काही माणसे दिसली. त्यांचा आवाज येत नसल्याने तो स्वतःहून त्यांच्या दिशेने चालत गेला. पुढे दोन लोक त्याला दिसले.
आरोग्य स्थिर
पाच दिवस दरीत अडकलेल्या गौतमची प्रकृती स्थिर असून, सध्या त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरीत अडकलेला तरुण पाच दिवसांनी जिवंत बाहेर आल्याने त्याच्या मित्र आणि कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आहे.
