TRENDING:

अपघातावेळी गौतमी पाटीलच्या चालकाने मद्यसेवन केलं होतं? मेडिकल रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

Last Updated:

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारने पुण्यात मुंबई-बंगळुरू हायवेवरील नवले ब्रीज परिसरात एका रिक्षाला पाठिमागून जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षाचालकासह अन्य दोन प्रवासी जखमी झाले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
३० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारने पुण्यात मुंबई-बंगळुरू हायवेवरील नवले ब्रीज परिसरात एका रिक्षाला पाठिमागून जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षाचालकासह अन्य दोन प्रवासी जखमी झाले. या अपघातावरून आता पुण्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. गौतमी पाटीलवर कारवाईची मागणी केली जात आहे. तसेच ज्यावेळी अपघात झाला, त्यावेळी गौतमीच्या ड्रायव्हरने मद्यपान केलं होतं, असा आरोपही केला जात आहे. या आता ड्रायव्हरच्या मेडिकल रिपोर्टमधून मोठी माहिती समोर आली आहे.
गौतम पाटील (नृत्यांगणा)
गौतम पाटील (नृत्यांगणा)
advertisement

संतोष दिनकर असं गौतमी पाटीलच्या ड्रायव्हरचं नाव आहे. ज्यावेळी अपघात घडला, त्यावेळी गौतमी पाटील कारमध्ये नव्हती. अपघातानंतर संतोष घटनास्थळावरून पळून गेला होता. मात्र अपघातानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने पोलिसांनी तातडीने संतोषला अटक केली. तेव्हा त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. आता याचा रिपोर्ट समोर आला आहे.

ससून हॉस्पिटलने जारी केलेल्या प्राथमिक अहवालात गौतमी पाटीलचा ड्रायव्हर संतोष दिनकर याने मद्यसेवन केले नसल्याचं म्हटलं आहे. हा गौतमी पाटीलसाठी मोठा दिलासा आहे. हा अपघात झाल्यापासून गौतमी पाटीलवर देखील कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. अशात संतोषने कार चालवत असताना मद्यसेवन नव्हतं केलं, अशी माहिती समोर आल्याने गौतमी पाटीलच्या काही प्रमाणात अडचणी कमी झाल्याचं दिसून येत आहे.

advertisement

३० सप्टेंबरला पहाटे काय घडलं ?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीत गोड-धोड खायला नको वाटतं? तर हा पदार्थ ट्राय करा, बाकरवडीही फिकी!
सर्व पहा

पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ 30 सप्टेंबर रोजी एका हॉटेलसमोर एक रिक्षा उभी होती. त्यात रिक्षाचालकासह दोन प्रवासी होते. मागून आलेल्या गौतमी पाटीलच्या भरधाव कारनं उभ्या असलेल्या रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की, यामध्ये रिक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या अपघातात रिक्षाचालकासोबतच रिक्षातील दोन प्रवासीही गंभीर जखमी झाले. पोलिसांना अपघाताबाबत माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, अपघातानंतर कारचालक फरार झाला होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी 30 वर्षीय वाहन चालकाला अटक केली आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
अपघातावेळी गौतमी पाटीलच्या चालकाने मद्यसेवन केलं होतं? मेडिकल रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल