पुणे : अनेक जण नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने गाव सोडून पुण्या सारख्या शहर ठिकाणी येतात. सोलापूरकडचे बाबुराव घोगे हेसुद्धा पुण्यात गेली अनेक वर्षांपासून शेंगदाणे, फुटाणे विक्री करत आहेत. एकीकडे जग आधुनिकतेकडे प्रवास करत आहे. इलेक्ट्रॉनिक काटे आले आहेत. पण बाबुराव घोगे हे आजही पूर्वी वापरले जाणारे जुनी मापटी वापरुन आपला व्यवसाय करत आहेत. आज याविषयीच लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
advertisement
पुण्यातील तांबडे जोगेश्वरी जवळ घोगे काका हे 1970 पासून खारे शेंगदाणे, फुटाणे, तिखट चण्यांची विक्री करत आहेत. आज त्यांचं वय 73 आहे आणि मागील 54 वर्षांपासून ते हा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. 1970 मध्ये 2 रुपये किलो दराने शेंगदाणे घेऊन विक्री करत होतो. तर आता ते दर दोनशेच्यावर गेले आहेत.
मी आज हा व्यवसाय जुनी मापटी, चिपटी घेऊनच करत आहे. अनेक लोक हे आवर्जून खाण्यासाठी इथे येतात. माल चांगला ठेवला की लोक येतात. यामध्ये तिखट शेंगदाणे, काबुली चणे, खारे शेंगदाणे, मुंबई फुटाणेची विक्री करतो, अशी माहिती बाबुराव घोगे यांनी दिली.
त्यांच्याकडे कित्येक वर्षांपासून येणारे ग्राहक आजही येतात. त्यांच्या या खमंग अशा शेंगदाण्यामुळे त्या परिसरात घोगे काका म्हणून अशी त्यांची ओळख झाली आहे. त्यांच्याकडे असणारी जुनी मापटी पाहून छान वाटतं, असंही अनेक ग्राहक सांगतात.