हैदराबादची बिर्याणी अन् गुलाब जामूनचं महाराष्ट्र कनेक्शन!, धाराशिवच्या खव्याची एकच चर्चा, लाखोंची उलाढाल

Last Updated:

धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील खवा क्लस्टर भूम येथील दररोज 500 किलो खवा हैदराबाद बिर्याणी व गुलाब जामुनसाठी हैदराबादला जातो.

+
हैदराबादची

हैदराबादची बिर्याणी अन् गुलाब जामूनचं महाराष्ट्र कनेक्शन!

उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव : देशभरात हैदराबादची बिर्याणी आणि गुलाब जामुन प्रसिद्ध आहेत. हैदराबादी बिर्याणीसाठी बनवल्या जाणाऱ्या ग्रेव्हीसाठी खवा वापरला जातो. यासाठी कुंतलगिरी व भूम परिसरातील खव्याला मोठी मागणी होत आहे. मागील 50 वर्षांपासून या खव्याला सातत्याने दररोज हैदराबाद येथून मागणी होते. यासाठी दररोज 25 ते 30 टन खवा हैदराबादला जातो.
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांनी जग गाजवलं! ॲपने मिळवला तिसरा क्रमांक, गुगलही देणार लाखो रुपयांचं बक्षीस
धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील खवा क्लस्टर भूम येथील दररोज 500 किलो खवा हैदराबाद बिर्याणी व गुलाब जामुनसाठी हैदराबादला जातो. भूम शहरातील विनोद जोगदंड यांच्या खवा क्लस्टर भूम येथुन 500 किलो खव्याला दररोज हैदराबादी बिर्याणी साठी मागणी होत आहे. हा खवा हैदराबादला पोहोचवला जातो आणि त्यातून दिवसाकाठी एक लाख रुपयांची उलाढाल होते.
advertisement
खवा क्लस्टर ही खवा निर्मितीची भट्टी असल्याने या ठिकाणी खवा निर्मिती केली जाते. दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून दुध संकलित करून खवा निर्मिती केली जाते आणि खवा क्लस्टर भूम आणि कुंथलगिरीचा खवा या नावाने प्रसिद्ध असलेल्या या खव्याला हैदराबाद येथे मोठी मागणी आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळतो तर खवा व्यवसायिक यांना चांगले आर्थिक उत्पन्न राहते.
advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
हैदराबादची बिर्याणी अन् गुलाब जामूनचं महाराष्ट्र कनेक्शन!, धाराशिवच्या खव्याची एकच चर्चा, लाखोंची उलाढाल
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement