पुणे : राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार पावसाने मराठवाड्यात पिकांचे नुकसान देखील झाल्याचे चित्र आहे. मात्र, यानंतरही आता पुन्हा मराठवाड्यासह विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. राज्यात उद्या 4 सप्टेंबर रोजी पावसाची काय परिस्थिती असेल, याचबाबत घेतलेला हा आढावा.
advertisement
राजधानी मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊसही पडण्याची शक्यता आहे. मुंबईसह पालघर, ठाणे, डोंबिवली या ठिकाणी दिवसभर ढगाळ वातावरण राहिल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्या मुंबईत कमाल 30°C तर किमान 21°C तापमान असेल.
पुण्यात उद्या ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी ऊन पडेल. घाटमाथ्यावर मात्र, संततधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उद्या पुण्यात कमाल 29°C तर किमान 22°C तापमान असेल.
सणानिमित्त गोड पदार्थ खात असाल तर दातांना होईल त्रास, नेमकी काय काळजी घ्यावी?, VIDEO
विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारेही वाहण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये उद्या कमाल 30°C तर किमान 22°C तापमान असेल.
Beed News : मूर्ती कामगार ते आज यशस्वी व्यावसायिक, लखपती झालेल्या व्यक्तिची कहाणी
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. येणाऱ्या आठवड्यात मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, उद्या संभाजीनगरमध्ये कमाल 29°C तर किमान 20°C तापमान असेल.
एकंदरीत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.