तारीख 3 नोब्हेंबर रोजी संतप्त नागरिकांनी पुणे नाशिक महामार्ग सुमारे 18 तास रोखून धरला होता नरभक्षक झालेल्या पिंपरखेड परिसरातील वन्यप्राणी बिबट्यास जेरबंद किंवा ठार करण्यासाठी वनसंरक्षक पुणे श्री आशिष ठाकरे यांनी तातडीने प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव तथा मुख्य वन्यजीव रक्षक महाराष्ट्र राज्य नागपूर यांची परवानगी घेतली होती. सदर नरभक्षक बिबट्या जेरबंद किंवा ठार करण्यासाठी वन विभागाने रेस्क्यू संस्था पुणे चे डॉ. सात्विक पाठक पशु चिकीत्सक, जुबिन पोस्टवाला आणि डॉक्टर प्रसाद दाभोळकर या दोन शार्प शूटरसह वनविभागाची टीम घटनास्थळ परिसरात तैनात करून सदर नरभक्षक बिबट्यास जेरबंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली.
advertisement
पुण्यात बिबट्या पकडण्याच्या मोहिमेत थरार!
दिवसभरात परिसरात ठीक ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावून बिबट्याचे भ्रमण मार्गावरील ठशांचे निरीक्षण करण्यात आले त्यानंतर रात्री तीन थर्मल ड्रोन च्या माध्यमातून घटनास्थळाच्या परिसरामध्ये त्या नरभक्षक बिबट्याचा शोध घेतला असता घटनास्थळापासून सुमारे 400 ते 500 मीटर अंतरावर सदर बिबट दिसून आला असता सदर टीमने त्यास बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारला परंतु तो अपयशी ठरल्याने बिबट चवताळून प्रति हल्ला करत असताना बंदूकधारी शार्प शूटर यांनी त्यावर रात्री 10.30 वाजता च्या सुमारास गोळी झाडल्याने सदर नर बिबट मृत झाला असून त्याचे वय अंदाजे पाच ते सहा वर्ष असल्याचे दिसून आले त्यानंतर सदर नरभक्षक बिबट्याचे शव मौजे पिंपरखेड येथील ग्रामस्थांना दाखविण्यात आले त्यानंतर सदर शव शवविच्छेदना करिता माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे हलविण्यात आले
सदर कार्यवाही श्री आशिष ठाकरे वनसंरक्षक वनवृत्त पुणे यांचे मार्गदर्शनाखाली श्री प्रशांत खाडे उपवनसंरक्षक जुन्नर श्रीमती स्मिता राजहंस आि श्री अमृत शिंदे सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर श्री निळकंठ गव्हाणे वनपरिक्षेत्र अधिकारी शिरूर व रेस्क्यू संस्थेचे सदस्य यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वी केली.
