पाटील याने "कंपनीत लगेच नोकरी लावतो" असे सांगत अनेकांना आगाऊ रक्कम भरण्यास भाग पाडले. पण नोकरी तर मिळाली नाहीच. एवढच नाही तर एकट्या पाटीलने तब्बल 17 लाखांहून अधिक रक्कमेचा अपहार केला असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीसांनी त्याला अटक केली आहे.
advertisement
फसवणुकीचा गुन्हा दाखल
श्वास संपादन करून स्वतःच आर्थिक फायदा करून घेतला. सोबतच फ्रेशर्स इंजिनीयर उमेदवारांची कोट्यावधी रुपयाची आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकरणात हिंजवडी पोलीस स्टेशन येथे उपेश रंजीत पाटील आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेकडो तरुणांच्या भविष्याशी खेळ
शेकडो तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या या फसवणूकखोरावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. ज्यांनी फसवणूक झालेली आहे त्यांनी आयटी फोरम आणि हिंजवडी पोलीस यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणी कुणाची फसवणूक झाली असेल तर हिंजवडी पोलिसांनी संपर्क साधण्याचं अवाहन केलं आहे
