TRENDING:

social media affect relationship : सोशल मीडियामुळे नातेसंबंधांवर भयंकर परिणाम, Divorce पर्यंत प्रकरणे... काय खबरदारी घ्यावी?

Last Updated:

सोशल मीडिया च्या अतिवापरामुळे नाते सबंधावर परिणाम झाला आहे यामुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्राची केदारी, प्रतिनिधी
advertisement

पुणे : सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. तसेच सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या माध्यमामुळे लोकांना एकमेकांशी जोडून ठेवण्यासाठी मदतही होत असते. मित्र मैत्रीण, नातेवाईक, प्रियजन एकमेकांच्या अधिक जवळ येत आहेत. हे असे असलं तरी सोशल मीडियाच्या सकारात्मक परिणांमासोबतच त्याचे नकारात्मक परिमाणही पाहायला मिळत आहे. सोशल मीडियाचा सर्वात मोठा फटका हा नातेसंबंधांवर होताना दिसत आहे. विशेष म्हणजे यामुळे घटस्फोट घेणाऱ्याची दाम्पत्यांची संख्याही ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

advertisement

याच अत्यंत महत्त्वाच्या विषयावर लोकल18 च्या टीमने पुण्यातील फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अ‍ॅडव्होकेट वैशाली चांदणे यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सोशल मीडियामुळे कसा परिणाम होतोय, घटस्फोटाची प्रमुख कारणे काय आहेत, यापासून बचावासाठी नेमकी काय काळजी घ्यावी, याबाबत महत्त्वाची माहिती दिली.

सोशल मीडियामुळे कसा परिणाम होतोय - 

कोरोनाकाळात अनेक गोष्टींमध्ये बदल झालेले आपण पाहिलेत. जसे की आरोग्य, कामाची पद्धत, वैयक्तिक आयुष्य या सर्वातच बदल झालेले आहेत. यात आणखी एक भर म्हणजे नातेसंबंध. या काळामध्ये सर्वात जास्त लोक ही सोशल मीडियावर सक्रिय होते. एकमेकांशेजारी बसली तरी संवाद हा होत नव्हता. त्यामुळे वाद निर्माण होत होते. एकमेकांना समजून न घेतल्यामुळे ते अजूनच वाढत होते. यामध्ये व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामवर मित्र मैत्रिणींशी संवाद वाढणारा संवाद, हेच वादाचे कारण बनले. यामुळे वेगळे नाते निर्माण होऊन घटस्फोटचे प्रकरणे वाढले आहेत.

advertisement

घटस्फोटाची प्रमुख कारणे काय आहेत - 

पती आणि पत्नी दोन्हीही जण  पैसे कमावत असल्यामुळे एकमेकांना समजून न घेता आपापले निर्णय हे परस्पर घेत आहेत. त्यामुळे कोरोनानंतर अनेक प्रकरण हे घटस्फोटची दाखल होत होती. यामध्ये 80 टक्के प्रमाण हे वाढले आहे. यामध्ये जर प्रामुख्याने काही कारणे पाहिली तर ती अंत्यत साधी असतात जसे की मुलांच्या आई वडिलांना सांभाळणार नाही.आपण वेगळं राहुयात. अविश्वास, अस्वस्थता, असुरक्षिता आणि विवाहबाह्य संबंध, सतत चॅटिंग, यामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ लागला आहे. रात्री उशिरापर्यंत चॅटिंग, अपुरी झोप, चिडचिड यामुळे मानसिक स्वास्थावर परिणाम होतो आहे. म्हणजेच नातेसंबंधावरही त्याचा परिणाम होतो आहे.

advertisement

inspiring story : वडील वॉचमन, आईसह तिनेही केली लोकांच्या घरची धुणीभांडी, पण न खचता आज सीमा बनली PSI

कोर्टात समुपदेशसाठी केले जाते मार्गदर्शन - 

ही सर्व प्रकरणे कौटुंबिक न्यायालय म्हणजेच फॅमिली कोर्टात दाखल केले जाता. त्यानंतर मेडीएशन अवेअरनेस प्रोग्राम घेतले जातात. यामधून संसार कशा पद्धतीने टिकेल यासाठी प्रयत्न हे केले जातात. तसेच समुपदेशन म्हणजे काऊन्सलिंगही केले जाते. मुलांच्या भविष्यासाठी ही एकत्र राहणं किती गरजेच आहे, हेदेखील त्यांना समजवून सांगितले जाते. म्हणजेच यामध्ये होणार मानसिक, शारीरिक आणि आर्थिक नुकसान टाळलं पाहिजे. या सर्व गोष्टी या मेडिएशन माध्यमातून सांगण्याचं कामही कोर्टात केले जाते.

advertisement

दररोज होतायत इतकी प्रकरणे दाखल -

सर्वसाधारण वैवाहिक वादाची दररोज 30 ते 40 प्रकरणे ही दाखल होतात. यामध्ये 9 ते 10 प्रकरणे परस्पर संमतीने घटस्फोटासाठी असतात आणि उर्वरित प्रकरणे वेगवेगळ्या कारणास्तव घटस्फोटासाठी दाखल झालेली असतात. म्हणजे एका महिन्याला जवळजवळ 840 केसेस या फाईल होत असतात. विशेष म्हणजे घटस्फोट घेणाऱ्यांमध्ये 25 ते 35 हा वयोगट सर्वात जास्त प्रमाणात आहे.

काय खबरदारी घ्यावी - 

अशा प्रकरणात यावर काय खबरदारी घ्यावी, यावर सांगतात त्या म्हणाल्या की, एकमेकांना समजून घेणे तसेच दोघांनी एकमताने विचार करणे, वाद होणार नाहीत याची खबरदारी घेणे, कुठल्याही गोष्टी लपून न ठेवता. आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहणे. जास्तीत जास्त काळ एकमेकांशी घालवणे, हे फार महत्त्वाचे आहे.

सोशल मीडियाचा अतिवापर नातेसंबंधाच्या मुळावर आला आहे. कौटुंबिक नात्यातील ओलावा टिकविण्याबरोबरच सोशल मीडियाचा गैरवापर नात्यात दुरावा निर्माण करू लागला आहे. सोशल मीडियाचा योग्य प्रमाणात वापर केला तर त्याचा नक्की फायदा होतो. मात्र, आता सोशल मीडियाच्या वापराचे लोकांना व्यसन लागले आहे. नातेसंबंधामध्ये दुरावा येऊन घटस्फोटाचे प्रमाण हे वाढत आहेत, असेही फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अ‍ॅडव्होकेट वैशाली चांदणे म्हणाल्या.

मराठी बातम्या/पुणे/
social media affect relationship : सोशल मीडियामुळे नातेसंबंधांवर भयंकर परिणाम, Divorce पर्यंत प्रकरणे... काय खबरदारी घ्यावी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल