TRENDING:

HSC Exam 2026: बारावीच्या परीक्षेबाबत महत्त्वाचं अपडेट, ‘या’ तारखेपासून मिळणार हॉलतिकीट

Last Updated:

HSC Exam 2026: हॉलतिकीट मिळवण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. हॉल तिकीट महाविद्यालयांमार्फत प्राप्त करता येणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: दहावी आणि बारावीच्या परीक्षा येत्या काही दिवसांत पार पडणार आहेत. विद्यार्थी देखील परीक्षेची तयारी करत आहेत. आता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. येत्या काही दिवसांत बारावीच्या परीक्षा पार पडणार असल्यामुळे विद्यार्थी हॉलतिकीट कधी मिळणार याची प्रतीक्षा करत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी सोमवारपासून हॉलतिकीट दिले जाणार आहेत.
HSC Exam 2026: बारावीच्या परीक्षेबाबत महत्त्वाचं अपडेट, ‘या’ तारखेपासून मिळणार हॉलतिकीट
HSC Exam 2026: बारावीच्या परीक्षेबाबत महत्त्वाचं अपडेट, ‘या’ तारखेपासून मिळणार हॉलतिकीट
advertisement

12 जानेवारीपासून हॉलतिकीट मिळणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी सांगितले की, येत्या 12 जानेवारीपासून महाविद्यालयांच्या लॉगिनवर विद्यार्थ्यांसाठी हॉलतिकीट उपलब्ध होणार आहे. हॉलतिकीट मिळवण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. हॉलतिकीट महाविद्यालयांमार्फत प्राप्त करता येणार आहे.

Pune News: पालकांनो सावधान! पतंग उडवायला गेला अन् जीव गमावला; पुण्यातील 12 वर्षांच्या श्लोकसोबत भयंकर घडलं

advertisement

View More

विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in वेबसाईटवरून हॉलतिकीट डाउनलोड करून घेता येईल. यासंदर्भात कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण असल्यास महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बारावीच्या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मंडळाकडून ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. नंतर, प्रत्येक उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी या हॉलतिकीटची कॉपी काढून विद्यार्थ्यांना द्यायची आहे. हॉलतिकीट मिळवण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क लागणार नाही. प्रवेशपत्राच्या प्रतीवर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची सही असणे आवश्यक आहे.

advertisement

हॉलतिकीटमध्ये काही चुका असतील तर...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात पुन्हा तेजी, केळी आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

बारावीच्या परीक्षेसाठी हॉलतिकीटमध्ये विषय किंवा माध्यम बदल असल्यास, संबंधित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन ते दुरुस्त करावे. हॉलतिकीटवरील फोटो, स्वाक्षरी आणि विद्यार्थ्याचे नाव यासंदर्भातील बदल ऑनलाईन करता येतील. जर हॉलतिकीट गहाळ झाले, तर महाविद्यालयांनी नवीन प्रत काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना द्यावा. फोटो चुकीचा असल्यास, नवीन फोटो चिकटवून मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांनी शिक्का आणि स्वाक्षरी करावी. अशा सूचना राज्य मंडळाकडून देण्यात आल्या आहेत.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
HSC Exam 2026: बारावीच्या परीक्षेबाबत महत्त्वाचं अपडेट, ‘या’ तारखेपासून मिळणार हॉलतिकीट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल