TRENDING:

Rain in Maharashtra : पुढील 3 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, पूर्व विदर्भात वाढणार पावसाचा जोर

Last Updated:

मुंबईसह कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
advertisement

पुणे : राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही भागात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर अनेक ठिकाणी नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून पुढील 3 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील काही दिवसात पावसाची काय परिस्थिती राहिल, याविषयीचा लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.

advertisement

मुंबईसह कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, पालघर, ठाणे याभागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्या मुंबईत दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे आणि कमाल 32°C तर किमान 25°C तापमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

advertisement

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात उद्या मुसळधार पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने वर्तवली आहे. तर कोल्हापूरमध्ये उद्या मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यात उद्या कमाल 30°C तर किमान 22°C तापमान असेल. तर कोल्हापूरमध्ये कमाल 31°C तर किमान 24°C तापमान असेल.

advertisement

nashik one day trip : नाशिकमध्ये एका दिवसात पाहता येतील ही 5 ऐतिहासिक मंदिरे

विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 2 दिवस पूर्व विदर्भात पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर चंद्रपूरमध्ये उद्या कमाल 32°C तर किमान 22°C तापमान असेल. पुढील 2 दिवस हे मराठवाड्यात मुसळधार पावसाचे असतील. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

advertisement

Swapnil Kusale : फायनलसाठी गावातली मंडळी स्वप्नीलच्या घरी, निकाल लागताच एकच जल्लोष, VIDEO

बीड, जालना, परभणी, संभाजीनगर, या जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण असेल. तर काही भागात हलक्याशा सरी कोसळतील, असे हवामान विभागाने म्हटले आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल 34°C तर किमान 25°C तापमान असेल.

राज्यभरात पावसामुळे नदी-नाले दुथडी भरुन वाहत असून पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. दुसरीकडे खरीप हंगामातील पिकांनाही पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. काही भागात यलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहेत. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Rain in Maharashtra : पुढील 3 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, पूर्व विदर्भात वाढणार पावसाचा जोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल