मुंबई : राज्यातून मागील काही दिवसांपासून थंडी गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ईशान्य मान्सून माघारी परतत असल्याने राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळेच वातावरणात उकाडा जाणवत असून थंडी कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. 1 फेब्रुवारी रोजी राज्यातील बहुतेक भागांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळेल अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. तर काही शहरांमध्ये सकाळच्या वेळी दाट धुके पडण्याची शक्यता आहे. पाहुयात फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण राज्यामध्ये हवामान कसे असेल.
advertisement
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये अंशतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. मुंबईतील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस एवढे राहणार आहे. मुंबईतील कमाल आणि किमान तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहेत. मध्यंतरी मुंबईतील किमान तापमान तब्बल 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. ते आता कमी होत असल्याचे पाहायला मिळते. राज्यातील दुसरे प्रमुख शहर असलेल्या पुणे शहरांमध्ये सकाळच्या वेळी धुके आणि त्यानंतर ढगाळ आकाश पाहायला मिळेल. तर पुण्यातील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस एवढे राहील.
बिस्किटामध्ये विष कालवलं अन् एकाच वेळी 10 श्वानांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळच्या वेळी दाट धुके पाहायला मिळेल. तर संभाजीनगरमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस एवढे राहील. मराठवाड्यामध्ये सकाळच्या वेळी हलकी थंडी जाणवत असली तरी दुपारच्या वेळी उष्णता असल्याचं पाहायला मिळते. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये दुपारनंतर ढगाळ आकाश पुन्हा सुरुवात होईल. तर नाशिकमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस एवढे राहील.
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. तर नागपूरमधील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस एवढे राहणार आहे. एकंदरीत संपूर्ण राज्यामध्ये पुढील दोन दिवस ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे.