पुणे : नावीन्य पूर्ण आणि सुंदर देखाव्यासाठी पुण्याचा गणेशोत्सव प्रसिद्ध आहे. यावर्षीही अनेक सुंदर असे देखावे पुण्यात पाहायला मिळत आहे. पुण्यातील महात्मा फुले वाडा या ठिकाणी असलेले जय जवान समता मित्र मंडळाने कारगिल युद्धाला 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कारगिलचा देखावा सादर केला आहे. यामध्ये घडलेल्या कारगिल युद्धाची हुबेहूब प्रतिकृती तयार करून हा देखावा तयार केला आहे. तर मग हा देखावा कसा तयार करण्यात आला, यासाठी किती कालावधी लागला, याचबाबत लोकल18 चा आढावा.
advertisement
कारगिल युद्ध शब्द एकला तरी अंगावर शहारे उभे राहतात. त्यात कारगिल युद्धाला नुकतीच 25 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने पुण्यात एक सुंदर असा देखावा पाहायला मिळत आहे. जय जवान समता मित्र मंडळाच्या वतीने हा देखावा तयार करण्यात आला आहे. पुण्यातील गंज पेठ या ठिकाणी असलेलं जय जवान समता मित्र मंडळाची स्थापना ही 1965 साली झाली. मंडळाचे हे 59 वे आहे.
भाणोरा वाजवून केली जाते गौराईची कान उघडणी, कोल्हापुरातील नेमकी ही परंपरा आहे तरी काय, VIDEO
यंदाच्या वर्षी कारगिल गाथा अतुल्य शौर्याची या देखाव्याच्या माध्यमातून कारगिल युद्धातील वीरांना मानवदंना म्हणून हा देखावा तयार करण्यात आला आहे. हे युद्ध जवळपास 60 दिवस सुरू होते. मात्र, यातील जे महत्वाचे 10 ते 15 दिवस आहेत, त्यामध्ये घडलेल्या महत्वाच्या घटनाचे सादरीकरण इथे केले आहे.
गौराई येते माहेरी, अलिबागमधील 50 वर्षांची परंपरा नेमकी काय, VIDEO
जवळपास 6 ते 7 दिवसामध्ये हा देखावा तयार केला. डोंगराला सजावट करून सैनिक, रणगाडे, गाव अशा सगळ्या गोष्टी यामध्ये मांडल्या आहेत. निसर्गाला कुठलीही हानी पोहचणार नाही अशा गोष्टींचा वापर याठिकाणी करण्यात आला आहेत. लाकूड, चटया, पोती, पीओपीचा वापर करण्यात आला आहे. या देखाव्याच्या माध्यमातून ती घटना कशी घडली, हे तुम्ही याठिकाणी अनुभवू शकतात. म्हणून जास्तीत जास्त लोकांनी येऊन हा देखावा पाहावा, असे आवाहन या मंडळाचे अध्यक्ष शुभम चिरमुल्ला यांनी लोकल18 शी बोलताना केले.