पुणे : शिवकालीन युगापासून आपल्याकडे मातीची भांडी वापरली जातात. त्यातल्या पदार्थांना स्वर्गीय चव येते, असे मानले जाते. आजच्या काळातही वापरण्यासाठी अशी भांडी अनेक दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. या भांड्यात जेवण बनवणे, हे आरोग्यासाठी फायदेशीर असते, असे म्हणतात. याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
सध्या सोशल मीडियावर आपण वेगवेगळ्या रेसिपीचे, मटका मिसळ किंवा कुल्हड वाली चाय, इतकेच काय तर मटका बिर्याणी, असे अनेक प्रकार पाहतो. मात्र, ही भांडी फक्त शोपीस म्हणूनच नाहीत तर आरोग्यासाठीही फायदेशीर असल्याची माहिती किर्ती टांकसाळे यांनी दिली.
advertisement
तुम्ही मातीच्या भांड्यांचा वापर जर दररोज केला तर तुम्ही शिजवलेल्या अन्नाचे सर्व गुणधर्म तुम्हाला जसेच्या तसे मिळतील. ही मातीची भांडी फक्त नॉनव्हेज बनवण्यासाठी नव्हे तर तुम्ही व्हेज भाज्या बनवण्यासाठीही वापरू शकता. सध्या मातीच्या भाड्यांविषयीची जागरूकता लोकांमध्ये वाढत चालली आहे. त्यामुळे लोक आता दैनंदिन जेवण बनवण्यासाठी ही मातीची भांडी वापरत आहेत.
मातीच्या भांड्यातून ही सर्व पोषक तत्व मिळतात. त्यापैकी कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, सिलिकॉन, कोबाल्ट आणि अशी अनेक पोषक तत्व मिळतात. त्यामुळे ही भांडी शारीरिक स्वास्थासाठी अत्यंत उपयुक्त असून डॉक्टरही या भांड्यामध्ये जेवण करण्याचा सल्ला देतात, अशी माहिती टांकसाळे यांनी दिली.
सणानिमित्त गोड पदार्थ खात असाल तर दातांना होईल त्रास, नेमकी काय काळजी घ्यावी?, VIDEO
या भांड्यांचा वापर योग्य पद्धतीने केला तर ती भांडी जास्त टिकाऊ असतात. लवकर खराब होत नाही. त्यामुळे कमी खर्चात तुम्ही सुंदर मातीची भांडी घेऊन छान जेवण शिजवून आरोग्यही सांभाळू शकता, असेही त्या म्हणाल्या.