पुणे : पुण्यात गँगवॉरने पुन्हा डोकं वर काढल आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या गँग पुण्यात अस्तित्वात आहेत पण आता या टोळ्यांची जेलमध्ये बसून हत्या करण्यापर्यंत मजल गेली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात झालीय.पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या खडी मशीन चौकात 3.45 च्या सुमारास एकाची निर्घृण हत्या करण्यात आली. 4 जण दोन दुचाकीवर येत जवळपास 9 गोळ्या झाडल्या आणि त्यातल्या २ गोळ्या त्या व्यक्तीला लागल्या. तर एवढच नसून, त्या आरोपींनी कोयत्याने पण वार केला ज्याने त्या रिक्षामध्ये बसलेल्या माणसाचा जागीच मृत्यू झाला आहे.
advertisement
या कालच्या घटनेचा थेट संबंध हा पुण्यातील जुन्या टोळीद्धाशी आहे कारण काल ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्याची ओळख गणेश काळे अशी पटली आणि त्याहून धक्कादायक बाब म्हणजे गणेश काळे हा समीर काळे याचा सख्खा भाऊ आहे. समीर काळे हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणी अटकेत असलेला एक आरोपी आहे ज्याने वनराज आंदेकरची हत्या करण्यासाठी मध्यप्रदेशहून 10 पिस्तुल पुरवल्या होत्या. प्राथमिक अंदाजानुसार, वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच गणेश काळेची हत्या करण्यात आली आहे.
9 जणांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
गणेश काळे ची निर्घचण हत्या केल्यानंतर आरोपी तिथून फरार झाले होते. मात्र त्यांना थोड्याच वेळात अटक करण्यात आली होती आणि हत्या करताना वापरलेल्या दोन पैकी एक गाडी आणि हत्यार जप्त करण्यात आली आहेत, अमन मेहबूब शेख, अरबाज अहमद पटेल, आणि दोन अल्पवयीन आरोपी असे एकूण चार आरोपी या प्रकरणी अटकेत आहेत. तर या सगळ्या प्रकरणी एकूण 9 जणांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
शिवजयंती आणि गणपती उत्सव साजरा करण्यासाठी पैशाची मदत
धक्कादाय बाब म्हणजे या नऊ आरोपींपैकी दोन आरोपी हे बंडू आणेकर आणि कृष्णा आंदेकर असून हे सध्या जेलमध्ये आहेत. या सगळ्यांनी वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच ही हत्या केल्याचं बोललं जात आहे. दोन्ही आंदेकर आयुष कोमकर हत्याप्रकरणी जेलमध्ये आहेत. तर जेलमध्ये बसूनच वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी या गणेश काळे याची हत्या झाली आहे हे आता जवळपास निष्पन्न झालं आहे. कारण यापूर्वी बंडू आणि कृष्णा आंदेकर यांनी या तीन आरोपींना शिवजयंती आणि गणपती उत्सव साजरा करण्यासाठी पैशाची मदत केली होती.
पुण्यात टोळीयुद्ध अजून सुरुच
काल झालेल्या हत्ये प्रकरणी एकूण 9 जणां विरोधात कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी दोन आरोपी अल्पवयीन आहेत.. बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर,आमिर खान ,मयूर वाघमारे ,स्वराज वाडेकर ,अमन शेख ,अरबाज पटेल इतर दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. आता या सगळ्या प्रकरणी आंदेकर यांनी कशी प्लॅनिंग केली हा कट कुठ रचण्यात आला किंवा थेट आंदेकर तुळशी कालच्या हत्येचा कसा संबंध आहे याचा तपास पोलीस करत आहे.. पण पुण्यातल्या टोळीच्या संघर्ष युद्धातून काल अजून एक हत्या झाली म्हणजे पुण्यात हे टोळीयुद्ध अजून देखील सुरूच आहे.
कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे
या सगळ्या घटनेनंतर पुणे पोलिसांचा या डोळ्यांवर आणि गुन्हेगारांवर वचक राहिलाय का? जेलमध्ये बसूनच हे कुख्यात आरोपी पुणे शहरात गुन्हेगारी चालवत आहेत का? असे प्रश्न निर्माण होत आहेत.. मात्र पुण्यात होणाऱ्या या सततच्या हद्दीमुळे पुणे शहराच्या कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे मात्र उडालेले पाहायला मिळत आहेत...
