नाशिक फाटा चौक हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा वाहतूक मार्ग आहे. येथे निगडी-दापोडी दरम्यान दुहेरी बीआरटी मार्ग आहे तसेच भोसरी, चाकण आणि पुणे दरम्यान बससेवा उपलब्ध आहे. कासारवाडी येथे रेल्वे स्थानक असून पुणे-नाशिक महामार्गामुळे एसटी बससेवाही मोठ्या प्रमाणावर चालते. शिवाय मेट्रोचे नाशिक फाटा स्थानक या चौकाजवळ असल्यामुळे प्रवाशांसाठी हे ठिकाण अधिक गजबजलेले आहे.
advertisement
याशिवाय जेआरडी टाटा उड्डाण पुलावरून भोसरी आणि वाकड बीआरटी मार्गाशी जोडणी असल्याने दररोज हजारो प्रवासी या चौकातून प्रवास करतात. मात्र सुरक्षित रस्त्यांचा अभाव नागरिकांसाठी नेहमीच धोकादायक ठरत होता.
या दिवशी सुरु होणार पूल
या पादचारी पुलाचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांना बस, मेट्रो आणि रेल्वे स्थानकांवर सुरक्षित आणि सोयीस्कर पोहोचता यावे हा आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या योजनेंतर्गत हा पूल उभारण्याचा निर्णय घेतला गेला असून प्रत्यक्ष काम महामेट्रोमार्फत सुरू आहे. सध्या या पुलाचे सुमारे 37 टक्के काम पूर्ण झाले आहे आणि पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत हा पूल वापरासाठी खुला होण्याची अपेक्षा आहे.
हा पूल शहरातील सार्वजनिक वाहतुकीसाठी विशेषतहा बांधण्यात येणारा पहिला पूल ठरणार आहे. या पुलामुळे नागरिकांना रस्ता सुरक्षितपणे ओलांडता येईल,प्रवास अधिक सुलभ आणि आरामदायक बनेल. तसेच वाहतुकीची गती वाढेल, चौकातील गर्दी कमी होईल आणि अपघाताची शक्यता घटेल. परिणामी, पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित, सोपा आणि सुखद होणार आहे.