पूल जरी लोकार्पित झाला असला तरी सध्या येथे वाहतूक मर्यादित आहे. औंध रस्त्यावर दुभाजक नसल्याने खडकी-बोपोडी मार्गातून येणारी दुचाकी वाहन उलट दिशेने येतात. त्यामुळे रहदारीच्या वेळेस येथे मोठी कोंडी होते. पुलावर दृश्यता कमी असते. विशेषतहा रात्री आणि पावसाळ्यात ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. नागरिकांनी महापालिका आणि वाहतूक विभागाकडे तक्रारी केल्या असून तरीही योग्य दिवे, मार्गदर्शक चिन्हे तसेच रस्त्यावरील सुधारणा अद्याप झालेली नाहीत. त्यामुळे या भागात वाहन चालवणे धोकादायक ठरत आहे.
advertisement
पूलावर सध्या तुरळक वाहतूक असते, त्यामुळे पादचारी मार्गाचा उपयोग लोकांना व्यायामासाठी आणि फेरफटका मारण्यासाठी होत आहे. मात्र काही तरुण हुल्लडबाजी करत आहेत. ते बाईकवर स्टंट करतात, वेगाने वाहन चालवतात, शर्यती लावतात आणि रस्त्याच्या मध्यभागी उभे राहून फोटो घेतात. यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहतूक दोन्ही प्रभावित होत आहेत.
वाहनचालकांच्या अपेक्षा होती की सांगवी-बोपोडी पूल मुळे बेमेन चौक, औंध-रावेत रस्ता, खडकी, बोपोडी आणि स्पायसर शाळा या रस्त्यांवरील वाहतूक कमी होईल. पण दुभाजक नसल्यामुळे हा पूल एकेरी मार्गापुरता मर्यादित राहिला आहे. परिणामी वाहनचालकांना अजूनही मोठा वळसा घालावा लागतो, वेळ वाया जातो आणि अपघाताची शक्यता वाढते. नागरिकांनी प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.