TRENDING:

Leopard Cat : देशात पहिल्यांदाच लेपर्ड कॅटचे यशस्वी प्रजन, पुण्यात घडली ऐतिहासिक घटना, Video

Last Updated:

Leopard Cat : ऑक्टोबर 2024 मध्ये मादी लेपर्ड कॅटने एका पिल्लाला जन्म दिला असून, हे पिल्लू सध्या सहा ते सात महिन्यांचे आहे. ही घटना केवळ पुण्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या वन्यजीव संवर्धनाच्या क्षेत्रात एक ऐतिहासिक घटना घडली आहे. दुर्मिळ आणि निशाचर अशा लेपर्ड कॅट या प्रजातीचे देशातील प्राणिसंग्रहालयात प्रथमच यशस्वी प्रजनन पुण्यात झाले आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये मादी लेपर्ड कॅटने एका पिल्लाला जन्म दिला असून, हे पिल्लू सध्या सहा ते सात महिन्यांचे आहे. ही घटना केवळ पुण्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आहे.
advertisement

या दुर्मिळ वन्यप्राण्यांच्या देखभालीसाठी संग्रहालयात खास व्यवस्था करण्यात आली होती. दोन नर आणि एक मादी लेपर्ड कॅट काही महिन्यांपूर्वी येथे आणण्यात आले. त्यांच्यासाठी नैसर्गिक अधिवासाशी सुसंगत, सुरक्षित आणि मोकळ्या जागेतील निवास उपलब्ध करून देण्यात आला. अनुभवी कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण देखरेखीमुळे आणि प्रयत्नांमुळे हे प्रजनन शक्य झाले.

SSC Result: लेकीनं पांग फेडलं, 10 बाय 10 च्या खोलीत राहून अभ्यास, 100 टक्के घेऊन दहावी पास!

advertisement

हे पिल्लू सध्या हॅन्ड रिअरिंग पद्धतीने, म्हणजेच मानवी निगराणीखाली आणि विशेष काळजी घेत वाढवले जात आहे. नैसर्गिक अधिवासातही क्वचित दिसणारी लेपर्ड कॅट ही अत्यंत लाजाळू आणि रात्री सक्रिय असणारी प्रजाती आहे. त्यामुळे प्रजननाची ही घटना वन्यजीवप्रेमींमध्ये आनंदाचे कारण ठरत आहे.

View More

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
युद्धाचा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना, फक्त दीड रुपये किलोने खरेदी, कांद्याला काय मिळतोय भाव?
सर्व पहा

लवकरच हे पिल्लू पर्यटकांसाठी बघण्यासाठी उघड करण्यात येणार असून, नागरिकांना या दुर्मिळ प्रजातीला जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे. राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाची ही उल्लेखनीय गोष्ट वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने नव्या दिशेचा मार्गदर्शक ठरत असून, पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरली आहे, अशी माहिती राजीव गांधी प्राणिसंग्रहालय पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. घनश्याम पवार यांनी दिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Leopard Cat : देशात पहिल्यांदाच लेपर्ड कॅटचे यशस्वी प्रजन, पुण्यात घडली ऐतिहासिक घटना, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल