SSC Result: लेकीनं पांग फेडलं, 10 बाय 10 च्या खोलीत राहून अभ्यास, 100 टक्के घेऊन दहावी पास!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
SSC Result: छत्रपती संभाजीनगरमधील एका मजुराच्या लेकीनं दहावी परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय. दीपाली शिंदे हिला 100 टक्के गुण मिळाले.
छत्रपती संभाजीनगर : परिस्थिती कशीही असली तरी कष्ट आणि मेहनतीने मोठं यश मिळवता येतं. छत्रपती संभाजीनगर येथील सर्वसामान्य कुटुंबातील लेकीनं हे सिद्ध करून दाखवलंय. 10 बाय 10 च्या घरात आई-वडिलांसह राहणाऱ्या दीपाली प्रमोद शिंदे हिनं दहावी बोर्डाच्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळवले आहेत. तिच्या या यशाचं सर्वत्र कौतुक होत आहे. लोकल18 सोबत बोलताना दीपालीनं आपल्या यशाबाबत सांगितलं.
दीपाली शिंदे ही छत्रपती संभाजीनगरमधील रामनगर परिसरात आई-वडिलांसह राहते. दीपालीचे वडील मजुरीचे काम करतात, तर आई एका खाजगी कंपनीत काम करते. ते सध्या फक्त 10 बाय 10 च्या खोलीत राहतात. अत्यंत प्रतिकूल आणि आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक परिस्थितीतही, या कुटुंबाने तिच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. अभ्यासात सातत्य ठेवत, वेळेचे नियोजन करून हे घवघवीत यश मिळवले आहे.
advertisement
AI क्षेत्रात इंजिनिअर व्हायचंय
दीपालीने पुढचे शिक्षण घेऊन एआय क्षेत्रात इंजिनिअर होण्याची भावना व्यक्त केली. यावेळी आम्ही दोघेही काम करतो, आम्हाला वाटले नव्हते की आमची मुलगी इतके चांगले गुण घेईल. पण तिने घरकाम करून त्यासोबतच अभ्यास करून हे यश मिळवले आहे. तिचे इंजिनियर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही तयार आहोत. तिने चांगले शिकावे तसेच इतर पालकांनी आपल्या मुलांना जे आवडते ते शिक्षण द्यावे, अशी प्रतिक्रिया दिपालीच्या आई - वडिलांनी दिली आहे.
advertisement
दरम्यान, दीपालीच्या या यशामागे आई-वडिलांची प्रेरणा, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि तिची मेहनत आहे. तिच्या या यशामुळे रामनगर परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
May 16, 2025 2:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
SSC Result: लेकीनं पांग फेडलं, 10 बाय 10 च्या खोलीत राहून अभ्यास, 100 टक्के घेऊन दहावी पास!