शहारतल्या सोसायटींमध्ये आणि आता एअरपोर्टच्या रनवेवर स्पॉट झाल्याची माहिती आहे. पुण्यातील औंध आणि सिंध सोसायटी अशा मध्यवर्ती भागात बिबट्या आढळल्याने वनविभाग अलर्ट झाला आहे.
शहरात दोन ठिकाणी दिसलेल्या बिबट्याच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर पुणे वन विभाग आणि रेस्क्यू टीम सतत घटनास्थळी उपस्थित राहून शोधमोहीम राबवत आहेत. थर्मल ड्रोनसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून परिसराची काटेकोर तपासणी सुरू झाली आहे. बिबट्याच्या एन्ट्रीच्या पार्श्वभूमीवर कृपया सतर्क राहावे, परंतु घाबरून जाण्याचे कारण नाही, असं आवाहन वन विभागाने केलं आहे.
advertisement
19 नोव्हेंबर रोजी बिबट्या थेट रन वे वर (Leopard on run-way)
19 नोव्हेंबरला पुणे विमानतळ रन वे वर बिबट्या दिसल्याची माहिती समोर आली होती. एअरपोर्ट प्रशासनाने तक्रार केल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळ परिसरात जाऊन पाहणी केली. मे महिन्यात आढळून आलेला बिबट्या तो पुन्हा एकदा दिसून आला. 19 नोव्हेंबर रोजी बिबट्या रन वे वर दिसून आला अशी माहिती आम्हाला विमानतळ प्रशासनाने दिली होती मात्र त्यात कोणतीही अनुचीत घटना घडली नाही
बिबट्यााठी पिंजरा उभरला
परंतु एअरपोर्ट परिसरात मात्र धोका असल्याचं स्पष्टीकरण वन विभागाकडून देण्यात आलं आहे. त्याला पकडण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून ज्या ठिकाणी एक पिंजरा उभारण्यात आला होता तो पिंजरा त्याच परिसरात थोड्या दुसऱ्या ठिकाणी लावण्यात आला आहे.
बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी
मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील शिरूर भागात बिबट्याने हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. शिरुरमध्ये दिवसाढवळ्या कुठेही बिबट्या दिसू लागले आहेत. नरभक्षक बिबट्यांमुळे शिरूर परिसरातील नागरिक धास्तावले आहेत. दिवसा घराबाहेर पडायलाही लोक घाबरत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याच्या दहशतीने जिल्ह्यात घबराटीचं वातावरण आहे, अशात शहरातही आता बिबट्या शिरल्याने त्याला लवकरात लवकर जेरबंद करावं, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
हे ही वाचा :
