Leopard Attack : अचानक बिबट्या समोर आला तर काय कराल? असं करा संरक्षण, वनविभागाने दिल्या महत्त्वाच्या सुचना

Last Updated:

बिबट्या अचानक समोर दिसल्यानंतर नागरिकांनी काही गोष्टींची काळजी घेतली तर होणारा संभाव्य हल्ला टाळता येऊ शकतो.

+
News18

News18

जालना : राज्यामध्ये अनेक ठिकाणी बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. अचानक बिबट्यासारखा हिंस्र प्राणी समोर दिसल्यानंतर काय करायचं असा प्रश्न आपल्याला पडतो. अनेकांची तर भीतीनेच गाळण उडते. परंतु बिबट्या अचानक समोर दिसल्यानंतर नागरिकांनी काही गोष्टींची काळजी घेतली तर होणारा संभाव्य हल्ला टाळता येऊ शकतो. यासंबंधी वनविभागाने नागरिकांना काही सूचना केल्या आहेत, पाहुयात.
रब्बी हंगाम सुरू असल्याने शेतकरी गहू किंवा अन्य पिकांना पाणी देण्यासाठी शेतामध्ये जातात. रात्रीच्या वेळी शेतात जात असताना मोबाईलवरती गाणी लावावी किंवा कुठलातरी आवाज सुरू ठेवावा जेणेकरून बिबट्यासारखा प्राणी आवाजाच्या दिशेने येणार नाही. शेतामध्ये जात असताना सोबत काठी बाळगावी आणि काठीला घुंगरू बांधावे. घुंगराच्या आवाजाने बिबट्या आपल्या आसपास फिरकणार नाही. त्याचबरोबर शेतामध्ये काम करत असताना बसून काम करू नये.
advertisement
लहान मुलं आणि वृद्धांना दिवस मावळल्यानंतर घराबाहेर पडू देऊ नका. लहान मूल हे बिबट्याच्या डोळ्यांच्या नजरेच्या खाली असते त्यामुळे लहान प्राणी समजून बिबट्या हल्ला करू शकतो. तर वृद्ध व्यक्तींवर देखील बिबट्या लवकर हल्ला करण्याची शक्यता असते.
बिबट्या समोर दिसल्यानंतर घाबरून किंवा पळून जाऊ नका. तर दोन्ही हात वर करून दोन पावले पाठीमागे सरका. घाबरल्यानंतर
advertisement
किंवा झुडपाच्या पाठीमागे लपण्याचा प्रयत्न केल्यास शिकारी प्राणी हल्ला करण्याची शक्यता असते. अशा पद्धतीने रात्रीच्या वेळी किंवा दिवसा नागरिकांनी काळजी घेतल्यास बिबट्याच्या होणाऱ्या संभाव्य हल्ल्यापासून आपले संरक्षण करता येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी वन विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि कुठेही बिबट्या किंवा अन्य हिंस्र प्राणी आढळून आल्यास वनविभागाला कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
दरम्यान, जालना जिल्ह्यातील बाजी उमरद आणि तीर्थपुरी या दोन शिवारामध्ये बिबट्या आढळून आला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने या गोष्टीची तात्काळ दखल घेऊन नागरिकांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/जालना/
Leopard Attack : अचानक बिबट्या समोर आला तर काय कराल? असं करा संरक्षण, वनविभागाने दिल्या महत्त्वाच्या सुचना
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement