पुणे : पुण्याच्या लोणी काळभोर पोलिसांच्या कारवाईत तडीपार आरोपीसह चार जणांना ताब्यात घेत पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. पाच धारदार कोयत्यांसह सुमारे 1 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच आरोपींची लोणी काळभोर मधील चौकातून धिंड काढण्यात आली, आरोपींना गुडघ्यावर रस्त्याने चालवत वरात काढण्यात आली त्यामुळे कायद्याचा धाक दाखवण्यात आला.
advertisement
प्रकाश काळू कांबळे मयुरेश्वर दत्तात्रय इटकर आणि अक्षण रविंद्र चव्हाण अशी समोर आली. त्यांच्या ताब्यातून ४ धारदार कोयते, दुचाकी आणि मोबाईल असा सुमारे १.४१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घोरपडे वस्ती परिसरात तीन युवक कोयते बाळगून ट्रिपलसीट दुचाकीवरून फिरत आहेत. अशी माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी तत्काळ सापळा रचून अंबिका माता मंदिराजवळ पाठलाग करून या तिघांना पकडले.
पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी तोंड उघडले
आरोपींना पोलिस आल्याची चाहूल लागताच आरोपींनी दुचाकीवरून पळ काढला अतिशय भरधाव वेगाने ते दुचाकी गल्लीबोळातून पळवू लागले. परंतु, लोणी काळभोर पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपींना ताब्यात घेतले. तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे धारदार कोयते मिळून आले. सुरुवातीला चौकशी केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी तोंड उघडले. त्यांच्याकडून मोठा घातपात करण्याची तयारी असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत. सखोल तपास करण्यासाठी न्यायालयामार्फत पोलिस कोठडीमध्ये रिमांड घेण्यात आली आहे.
सराईतांवर लक्ष ठेवण्याचे आदेश
पुणे शहरातील वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर उपनगर व शहरात नव्याने दाखल झालेला लोणी काळभोर पोलिस ठाण्याचा भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच सराईतांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते.
तडीपार गुन्हेगार कोयत्यासह जेरबंद
लोणी काळभोर पोलिसांनी या कारवाईसोबतच तडीपार असताना देखील पुन्हा आदेशाचा भंग करून फिरणाऱ्या रोहित पाटील याला पकडले आहे. त्याची झडती घेतली असता त त्याच्या शस्त्र आढळून आले. तो कशासाठी हद्दीत आला होता, यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत. या कारवाईनंतर गुन्हेगारांचे धाबे चांगले दणाणले आहेत.
हे ही वाचा :
