हत्या करून मृतदेह फेकला, हातावरचा 'टॅटू' पेट्रोलने पेटवला, अमरावतीच्या शेतात कोणाचा मर्डर?

Last Updated:

आरोपींनी ओळख पटू नये म्हणून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

News18
News18
अमरावती : वलगाव-चांदूरबाजार महामार्गावरील शिराळा शेतशिवारात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृतकाच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात चाकूचे घाव असून, त्यानंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने पेट्रोल टाकून संपूर्ण शरीर जाळून टाकल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी शिराळा शेतशिवारात मजुरीसाठी आलेल्या शेतमजुरांना एका तरुणाचे जळालेलं शव दिसून आलं. त्यांनी तत्काळ याबाबत वलगाव पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वलगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉग स्कॉट, फॉरेन्सिक पथक आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतकाची ओळख अद्यापही पटलेली नाही पुढील तपास वलगाव पोलीस करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली.
advertisement

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

प्राथमिक तपासात मृतकाच्या शरीरावर चाकूचे अनेक घाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, मृतकाच्या हातावर नाव गोंदण्यात आले होते, मात्र तेही पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे आरोपींनी ओळख पटू नये म्हणून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हत्येमुळे परिसरात भीतीचं वातावरण

advertisement
सध्या मृतकाची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी आसपासच्या परिसरातील हरवलेल्या व्यक्तींची माहिती तपासण्यास सुरुवात केली असून, शेजारच्या गावांतील पोलिस ठाण्यांनाही माहिती कळविण्यात आली आहे. घटनास्थळी मिळालेल्या काही वस्तू फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास वलगाव पोलिस करत असून, हत्या कुठल्या कारणावरून झाली, तसेच यात किती जणांचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, या हत्येमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
advertisement

जन्मदात्या आई वडिलांवर कुऱ्हाडीने वार करत संपवलं

चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे गावात गुरुवारी सकाळी घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. कौटुंबिक वादातून एका तरुणाने आपल्या आई-वडिलांचा निर्घृण खून करून स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून, गावात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आई लता डुकरे, मुलगा विशाल डुकरे, वडील सुभाष डुकरे अशी मृत व्यक्तींचे नावे आहेत.विशाल डुकरे हा काही दिवसांपासून दारूच्या आहारी गेला होता. काल रात्री तो मद्यधुंद अवस्थेत घरी परतला. घरात झोपलेल्या आई- वडिलांच्या डोक्यात आणि मानेवर त्याने कुऱ्हाडीने वार करून दोघांना जागीच ठार केले. नंतर त्याने घरातच फाशी घेऊन जीवन संपवलं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
हत्या करून मृतदेह फेकला, हातावरचा 'टॅटू' पेट्रोलने पेटवला, अमरावतीच्या शेतात कोणाचा मर्डर?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement