Pimpri Crime: पिंपरीत 8 वर्ष माला बनून राहिली, ATS च्या कारवाईत उघडकीस आलं मोठं षड्यंत्र

Last Updated:

पुण्यात बांग्लादेशी घुसखोर मोठ्या संख्येने स्थायिक झाल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.

News18
News18
पुणे :  मागील काही वर्षात पुण्यात बांगलादेशी नागरिक वाढले असून इतरही जिल्ह्यात ही संख्या वाढल्याचं बोललं जातंय. पोलिसांकडून (Pune Police) बांग्लादेशींवर कारवाई होताना दिसत नसल्याने घुसखोरांचे फावल्याचे दिसत आहे. त्यामुळे बांग्लादेशी नागरिकांची घुसखोरी हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दरम्यान दहशतवादी विरोधी पथकाने भोसरी परिसरात केलेल्या एका धडक कारवाईत बांगलादेशी महिलेला अटक करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गेली आठ वर्षे ही महिला अवैधरित्या राहत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आली असून तिला परत बांग्लादेशला पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, फातिमा अमजद अख्तर (वय 35) असे या महिलेचे नाव आहे. ही महिला गेल्या सात ते आठ वर्षांपासून भारतात वास्तव्यास आहे. पण, ती मूळची बांग्लादेशातील असल्याची माहिती आहे. सुरुवातीला वैध व्हिसावर कामाच्या शोधात ती भारतात आली होती. महत्त्वाचे म्हणजे भोसरी परिसरात ‘माला विठ्ठल डावखर उर्फ फातिमा बेगम फईमुद्दीन’ या खोट्या नावाने ती स्थानिक कुटुंबांकडे घरकाम करत होती.
advertisement

कोणतीही वैध कागदपत्रे आढळली नाही

या काळात तिने लग्नही केलं. तिने कर्नाटकच्या एका युवकासोबत लग्न केलं आणि हे दोघंही भोसरीत एकत्र राहत होते लागले. आश्चर्य म्हणजे, तिच्या पतीला सुद्धा तिच्या बांग्लादेशी नागरिकत्वाबाबत आणि व्हिसाची मुदत संपल्याची माहिती असूनही त्याने ही बाब लपवून ठेवली होती. ATS ला या संदर्भात माहिती मिळताच त्यांनी तातडीने कारवाई केली आणि फातिमाला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत तिने आपली खरी ओळख मान्य केली असून, तिच्याकडे कोणतीही वैध कागदपत्रे आढळेली नाहीत.
advertisement

कारवाईकडे डोळेझाक केली जात आहे का?

पुण्यात बांग्लादेशी घुसखोर मोठ्या संख्येने स्थायिक झाल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. यंत्रणेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यात गेल्या काही वर्षात हजारो बांग्लादेशी कुटुंबासह पुण्यात वास्तव्यास आहेत. दरम्यान पोलिसांना विशेष शोध मोहीम राबविण्याचे आदेश असून त्यानंतर्गत बांगलादेशी घुसखोर शोधणे, त्याची ओळख पटवणे तसेच त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करणे, त्यांचे अजून कोणी साथीदार आहेत का? त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? या सर्वांचा तपास करणे अशा कामांना वेळ लागत असल्याने पोलिसांकडून या कारवाईकडे डोळेझाक केली जाते आहे का? असाच प्रश्न आता उपस्थित होतोय.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pimpri Crime: पिंपरीत 8 वर्ष माला बनून राहिली, ATS च्या कारवाईत उघडकीस आलं मोठं षड्यंत्र
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement