राज्याची राजधानी मुंबईसह कोकण किनारपट्टीतील यामध्ये उष्ण आणि दमट हवामान पाहायला मिळत आहे. उत्तर कोकणातील पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यांना हवामान विभागाने उष्णतेचा येलो अलर्ट दिला आहे. जालना आणि छत्रपती संभाजीनगर मधील कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.
advertisement
पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातही तापमानाचा पारा हा 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. पुण्यामध्ये 22 एप्रिल रोजी कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तर कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये ढगाळ हवामान राहणार असून पावसाच्या हलक्या सरी कोसळू शकतात.
विदर्भामध्ये मात्र कमाल तापमानाचा उच्चांक पाहायला मिळत आहे. नागपूरमध्ये 22 एप्रिल रोजी कमाल तापमान तब्बल 45 अंश सेल्सिअस पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांना उष्णतेसाठी येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
वाढत्या उष्णतेच्या या काळामध्ये नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, जास्तीत जास्त पाणी प्यावे, हलके कपडे परिधान करावेत तसेच दुपारी 11 ते 4 या वेळेमध्ये घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.





