कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांत उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. 6 एप्रिलला मुंबईतील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश राहून वातावरण दमट आणि उष्ण राहण्याची शक्यता आहे. पुढील 2 दिवसांत मुंबईतील तापमानात वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
advertisement
बैलाच्या पायाला पत्री का मारतात? 99 टक्के लोकांना माहित नसेल यामागचे कारण Video
पुण्यातील कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 6 एप्रिलला पुण्यात मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं. त्याचबरोबर पुढील 24 तासांत पुण्यातील तापमानात वाढ होणार असल्याची माहिती देखील हवामान विभागानं दिली आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 6 एप्रिलला मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं. पुढील 24 तासांत तेथील तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
नाशिकमधील तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे. 6 एप्रिलला तेथील कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं.
नागपूरमधील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 6 एप्रिलला त्याठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण असू शकतं. नागपूरमधील तापमानात पुढील काही दिवसांत वाढ होऊन ते 41 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विदर्भातील अकोला, बुलढाणा या जिल्ह्यातील तापमानात चांगलीच वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
राज्यातून पावसाचे वातावरण गायब होऊन आता सर्वत्र तापमानाचा पारा वाढतांना दिसून येत आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी दमट वातावरण निर्माण होण्याची देखील शक्यता आहे. वातावरणात पुन्हा अचानक बदल होत असल्याने नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.