बैलाच्या पायाला पत्री का मारतात? 99 टक्के लोकांना माहित नसेल यामागचे कारण Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
बैलांना शेतातील सर्व कामे करावी लागतात. त्यामुळे बैलांच्या खुरांची मोठ्या प्रमाणात झीज होते. अश्यावेळी बैलाच्या पायाला पत्री मारली जातात.
बीड : भारतात शेती करण्यासाठी बैल हा प्राणी महत्त्वाचा आहे. शेतकरी हा बैलाची जीवापाड काळजी घेत असतो. बैलाची काळजी घेताना त्याच्या खुरांची काळजी घेतली जाते. बैलांना शेतातील सर्व कामे करावी लागतात. त्यामुळे बैलांच्या खुरांची मोठ्या प्रमाणात झीज होते. अश्यावेळी बैलाच्या पायाला पत्री मारली जातात. तर ही पत्री मारण्याची परंपरा काय आहे? याविषयीचं अभ्यासक शेषराव पवार यांनी माहिती दिली आहे.
बैलाच्या पायांना पत्री मारण्याची परंपरा विशेषतः पोळा आणि बैलपोळा यांसारख्या सणांमध्ये पाहायला मिळते. पत्री म्हणजे पितळ, तांबे किंवा लोखंडाच्या पत्रकांची बनवलेली पट्टी असते जी बैलाच्या पायांवर बांधली जाते. या पत्रीमुळे बैल चालताना सुंदर आवाज होतो. पवार सांगतात की गावात असे मानले जाते की हा आवाज वाईट नजरेपासून बैलाचं संरक्षण करतो. त्यामुळे ही परंपरा केवळ सौंदर्याच्या दृष्टीने न पाहता श्रद्धेने जपली जाते.
advertisement
पूर्वीच्या काळी शेतकरी बैलांना केवळ कामासाठीच वापरत नव्हते तर त्यांना कुटुंबाचा एक भाग मानत. पोळा, दसरा, संक्रांती अशा सणांमध्ये बैलांना सजवणं, त्यांना चांगलं अन्न देणं आणि त्यांच्या पायांना पत्री बांधणं ही भावना प्रेम, आदर आणि कृतज्ञतेची होती. शेषराव पवार सांगतात की पत्री म्हणजे एक प्रकारचा अलंकार असून त्यातून बैलाचं महत्त्व अधोरेखित केलं जातं. यासोबतचं बैलांच्या पायाच रक्षण होते.
advertisement
आजच्या काळात तंत्रज्ञानामुळे शेतीत बदल झाला आहे आणि बैलांचा वापर कमी झाला आहे. तरीही अनेक शेतकरी आजही आपल्या बैलांवर अपार प्रेम करतात. काही भागात ही परंपरा थोडी कमी झाली असली तरी अजूनही महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये ही परंपरा जपली जाते. पवार सांगतात की ही फक्त एक परंपरा नसून आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहे.
advertisement
शेवटी शेषराव पवार यांनी सांगितलं की बैल हा आपल्या ग्रामीण संस्कृतीचा आत्मा आहे. त्याच्या पायांना पत्री मारणं ही एक श्रद्धेची आणि प्रेमाची अभिव्यक्ती आहे. अशा परंपरा जपणं म्हणजे आपल्या संस्कृतीची मुळे अधिक घट्ट करणं. ही प्रथा भावी पिढीपर्यंत पोहोचवणं आपली जबाबदारी आहे.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
April 05, 2025 6:11 PM IST