मुंबई शहर आणि उपनगरामध्ये अंशतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस, किमान तापमान 26 असणार आहे. आद्रता असल्याने मुंबईकरांना उकाडा जाणवू शकतो. तर कोकणातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर पुण्यामधील कमाल तापमान 41 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे. तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस एवढे असेल. पश्चिम महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये कोरडे हवामान राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
advertisement
आंबा फक्त ग्राहकांसाठी गोड, शेतकऱ्यांसाठी मात्र कडूच, भाव मिळेनाच! Video
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि अहिल्यानगरमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस विजांसह होऊ शकतो. नाशिकमध्ये कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
आगामी काही काळामध्ये उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. मागील काही दिवसांमध्ये मराठवाड्यामध्ये तापमानाचा पारा हा चांगलाच वाढल्याचे पाहायला मिळते. अगदी तापमान 43 अंश सेल्सिअस पर्यंत वाढल्याचे पाहायला मिळाले. मराठवाड्यातील लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये कोरडे हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसासाठी अलर्ट केले आहेत. यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, उर्वरित जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भामध्ये 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहून विजांसह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.





