TRENDING:

kondhwa Traffic Update : कोंढव्यात उद्या वाहतुक मोठा बदल; कोणते मार्ग बंद? पर्यायी मार्गांची लिस्ट जारी

Last Updated:

Traffic Update Kondhwa : कोंढवा परिसरात दि. 21 सप्टेंबर रोजी होणाऱ्या हाफ मॅरेथॉनमुळे वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.नागरिकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : कोंढवा येथे हाफ मॅरेथॉन निमित्त वाहतुकीसाठी विशेष बंदी आणि पर्यायी मार्गांची योजना जाहीर करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील कोंढवा परिसरात दि. 21 सप्टेंबर रोजी हाफ मॅरेथॉन स्पर्धा होणार असल्यामुळे नागरिकांची आणि प्रवाशांची सोय तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. या स्पर्धेमुळे परिसरात गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि कायदा तसेच सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी आदेश जारी केले आहेत.
News18
News18
advertisement

कोणे मार्ग असतील बंद?

मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 115 तसेच शासन गृह विभागाच्या दिनांक 19 मे 1990 च्या अधिसूचनेच्या अधिकारांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार 21 सप्टेंबर रोजी पहाटे 4 वाजल्यापासून सकाळी 9 वाजेपर्यंत एन.एच.-65 आणि एन.एच.-965, दिवेघाट मार्गे सासवडकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. या काळात वाहतूक पर्यायी मार्गांद्वारे वळविण्यात येईल.

advertisement

जड आणि अवजड वाहने सासवड, दिवेघाट, मंतरवाडी चौक मार्गे वळविण्यात येतील. वाहन प्रवाशांच्या सुरक्षिततेसह कोंढवा आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी हे मार्ग निवडण्यात आले आहेत. हलकी चारचाकी वाहने सासवड , चांबळी, गराडे मार्गे मरीआई घाट ते खेड शिवापूर मार्गे वळविण्यात येतील. यामुळे हाफ मॅरेथॉन मार्गावर कोणतीही अडथळा निर्माण होणार नाही.

advertisement

प्रशासनाने नागरिकांना विनंती केली आहे की त्यांनी या दिवशी पर्यायी मार्गांचा अवलंब करून आपली गाडी आणि वाहन नेण्याची व्यवस्था करावी. सासवड , कोंढवा , पुणे, सासवड ,दिवेघाट, मंतरवाडी तसेच सासवड, चांबळी, गराडे , मरीआई घाट, खेड शिवापूर ,कात्रज घाट (चारचाकी वाहनांसाठी) या मार्गांचा या दिवशी उपयोग करावा. नागरिकांनी या मार्गांचा अवलंब केल्यास ट्राफिक कोंडी टाळता येईल आणि सर्वांचा प्रवास सुरळीत होईल.

advertisement

तसेच प्रशासनाने स्पर्धेच्या मार्गावर सुरक्षा कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली आहे. रस्त्यावर वाहन न उभे करण्याची सूचना, मार्गावर पार्किंग बंदी, तसेच मार्गावरील सर्व आवश्यक सुरक्षा उपाय अमलात आणले आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना पाळल्यास हा कार्यक्रम सुरळीत पार पडेल.

कोंढवा हाफ मॅरेथॉनमुळे परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीसाठी प्रशासनाची ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. नागरिकांनी या दिवशी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे आणि मार्गदर्शनासाठी पोलिस आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अपेक्षित आहे. यातून हाफ मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी होईल आणि नागरिकांच्या प्रवासावर फारसा परिणाम होणार नाही.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
kondhwa Traffic Update : कोंढव्यात उद्या वाहतुक मोठा बदल; कोणते मार्ग बंद? पर्यायी मार्गांची लिस्ट जारी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल