पुणे : आपली आवड जपण्यासाठी तसेच एखाद्या गोष्टीची जिद्द असेल तर ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी व्यक्ती कोणत्याही वयात सर्व प्रयत्न करतो. आज अशाच व्यक्तीची कथा आपण ज्यांनी घेणार आहोत. आतापर्यंत 71 वर्षे वयाच्या या व्यक्तीने 251 ट्रेक सर केले आहेत. प्रा. यशवंत कृष्णा फणसे यांची ही कहाणी आहे.
प्रा.यशवंत कृष्णा फणसे हे भोर शहरातील राजगड ज्ञानपीठ संचलित अनंतराव थोपटे महाविद्यालयातील सेवा निवृत्त ग्रंथपाल आहेत. त्यांनी तरुणांनाही लाजवेल अशी कामगिरी केली आहे. वयाच्या 71 व्या वर्षात कात्रज ते सिंहगड ट्रेक सलग 251 वेळा पुर्ण करण्याचा विक्रम त्यांनी केला आहे.
advertisement
ट्रेकचे अंतर 22 किलोमीटर असून छोट्या, मोठ्या 18 डेकड्यांचा यात समावेश आहे. आठवड्यामधून नियमित गुरुवार, शनिवार व रविवार- असे तीन वेळा नियमित ते ट्रेकला जातात. सेवानिवृत्तीनंतर कात्रजमध्ये स्थायिक झाल्यानंतर आपल्या मित्र परिवाराबरोबर फिरणे सुरू होते. मात्र, कोरोना काळात बाहेर पडणं अवघड झाले असताना डॉ. वसंत बुगडे यांच्या प्रेरणेतून त्यांनी ट्रेकिंगला सुरुवात केली. त्यानंतर हा ट्रेक अविभाज्य अंग बनला आहे, असे ते म्हणाले.
मराठवाड्यात याठिकाणी होणार पाऊस, शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यावी, महत्त्वाची माहिती
कात्रज बोगद्याच्यावर निसर्गाने मुक्तहस्ते सौंदर्याची उधळण केलेल्या परिसरात शिंदेवाडीगावचे वाघजाई देवीचे मंदिर आहे. येथे देवीचे दर्शन घेऊन सफरीला खऱ्या अर्थाने प्रारंभ होतो. पुढे हत्ती डोंगर लागतो. त्यानंतर डोंगराच्या कड्यामध्ये ससेवाडी गावाची देवी, झोराई माता मंदिर असा प्रवास रात्रीच्या गर्भात करावा लागतो सोबतीला मित्र परिवारही असते. टॉर्च, पाणी, काठी, काळ्याकुट्ट अंधारात पावसाळ्यात डोकेभर गवतातून वाट काढत जंगली जनावरे आणि सरपटणारे साप यांचा विचार करून एक एक पाऊल पुढे टाकले जाते. गेल्या काही वर्षांचा ट्रेकचा प्रवास डोळ्यासमोर उभा राहतो, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रातील या गावांमध्ये घरामध्ये किंवा सार्वजनिक मंडळात गणपती बसवत नाहीत, काय आहे यामागचे कारण?
उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्हीही ऋतूत ट्रेक करतांना त्यांना आपल्या मित्रपरिवाराची साथ मिळते आणि यामुळे त्यांनी वयाच्या एक्काहत्तरीत देखील 251 वेळा ट्रेक करता आले. आवड असेल तर माणसाकडे त्यावरच समाधान देखील मिळते, असे त्यांच्या या कामगिरीकडे पाहून दिसते.