महाराष्ट्रातील या गावांमध्ये घरामध्ये किंवा सार्वजनिक मंडळात गणपती बसवत नाहीत, काय आहे यामागचे कारण?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
मागील 250-300 वर्षांपासून या गावामध्ये अशाच पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. मात्र, दोन्ही गावांतील गणपती मंदिरांमध्ये भद्रोत्सव साजरा केला जातो. नेमका काय आहे हा प्रकार ते जाणून घेऊयात.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : महाराष्ट्रात गणेशोत्सवात गल्ली, गाव, शहर, वस्ती, वाड्या अनेक ठिकाणी गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. त्याचबरोबर अनेक ठिकाणी गणरायाची मंडळ महाराष्ट्रात तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. सध्या संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाची धामधुम सुरू आहे. घरघुती गणपती बरोबरच सार्वजनिक गणपतीही विराजमान झाले आहेत.
सगळीकडे उत्साहाचे, आनंदाचे, चैतन्याचे वातावरण आहे. मात्र, महाराष्ट्रात असे एक गाव आहे ज्या गावात गणेशोत्सव साजरा केला जातो. पण घरात किंवा सार्वजनिक मंडळात गणपती बसवले जात नाहीत. सातारा जिल्ह्यात हे गाव आहे. त्यामागची कथा ही थरारक आणि रोमांचकारी आहे.
advertisement
मागील 250-300 वर्षांपासून या गावामध्ये अशाच पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. मात्र, दोन्ही गावांतील गणपती मंदिरांमध्ये भद्रोत्सव साजरा केला जातो. नेमका काय आहे हा प्रकार ते जाणून घेऊयात.
सातारा जिल्ह्यातील अंगापूर नावाचे हे गाव आहे. या ठिकाणी गणेशाबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. 250-300 वर्षांपूर्वी अंगापूर गावातील सुवर्णकार समाजातील गणेश भक्त दर्शनास संकष्टी चतुर्थीला मोरगावला पायी जायचे. बरीच वर्ष त्याचा हा नित्यक्रम सुरू होता. सुवर्णकार वृद्ध झाल्यानंतर त्यांनी विचार केला, की आता आपणास एवढे चालणे होणार नाही. म्हणून एका चतुर्थीस गेल्यावर त्याने गणेशाला आपले मनोगत सांगितले.
advertisement
हे मयुरेश्वरा आजपर्यंत मी तुझी सेवा केली. परंतु वृद्ध झाल्याने आता यापुढे ती सेवा शक्य होणार नाही. त्यावेळी मयुरेश्वर त्याला दृष्टांत दिला की, मी तुझ्याबरोबर येत आहे, पण तू मागे वळून पाहू नको. नाहीतर मी तेथेच थांबेल. गणेशभक्त अंगापूरला परत येण्यास निघाला. तो अंगापूरजवळ आला व तेथे त्यांनी मागे वळून पाहिले. तेथेच गणेश अदृश्य झाले.
advertisement
सुवर्णकाराने ही घटना गावकऱ्यांना सांगितली. ज्या ठिकाणी गणेश अदृश्य झाले, त्या ठिकाणी गावकऱ्यांनी उकरून पाहिले असता गणेशाची मूर्ती सापडली होती. त्याच ठिकाणी गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली, अशी आख्यायिका सांगितली जाते. आत्मगजानन मंदिराच्या या उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने इथे येतात.
advertisement
मंदिर कशाप्रकारे बांधण्यात आले आहे -
advertisement
आत्मगजानन हे मंदिर हेमाडपंती रचनेत असून सन 1780 ते 1800 च्या दरम्यान, बांधण्यात आले आहे. ते अतिशय भव्य आहे. मंदिर.परिसरात कुठेही लाकूड स्वरूपातील आधार घेतलेल्या असे बांधकाम किंवा कुठल्याही प्रकारची लाकूड वापरले गेले नाही असे, हे भव्य मंदिर आहे. गणेश चतुर्थीला ते अनंत चतुर्दशी या काळात संपूर्ण महाराष्ट्रात गणपती बसवला जातो. मात्र, अंगापूर गावांमध्ये कोणाच्याही व्यक्तिगत घरी किंवा सार्वजनिक ठिकाणी गणपतीची प्रतिष्ठापना केली जात नाही किंवा या गावचा बाहेर कुठेही नोकरीला असलेला रहिवाशी गणपती बसवत नाही. ही अंगापूरची 250 वर्षांची परंपरा आहे.
advertisement
बाप्पाला द्या गोड गोड नैवेद्य, बनवा चविष्ट आणि लुसलुशीत गोड वडे, सोपी रेसिपी, VIDEO
या भद्रोत्सवात सुवर्णकार समाजाची सातवी पिढी उत्सवात सहभागी होत असते. आत्मगजानन हे मोरगावचे उपपीठ आहे. या गणपतीचे तोंड हे मोरगावकडे आहे. उत्तराभिमुख असणारा हा गणपती आहे. मोरगाव येथील स्थापत्य कला येथील मंदिराचे साम्य आहे. मात्र, याची पूजाअर्चा वर्षभर या मंदिरात सुरू असते, असेही सांगण्यात आले आहे.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
September 13, 2024 7:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
महाराष्ट्रातील या गावांमध्ये घरामध्ये किंवा सार्वजनिक मंडळात गणपती बसवत नाहीत, काय आहे यामागचे कारण?