TRENDING:

Pune : आमदाराच्या मामाचं अपहरण, हॉटेलसमोर थांबले असताना गाडीतून आलेल्या चौघांनी नेलं उचलून

Last Updated:

सोलापूर रस्त्यावर एका हॉटेलसमोर उभा असलेल्या सतीश वाघ यांचं अपहरण चौघांनी केलं असून या प्रकरणी पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुण्यातील आमदाराच्या मामांचे अपहऱण करण्यात आल्याची धक्कादायक अशी घटना घडलीय. चारचाकी गाडीतून आलेल्या चौघांनी अपहरण केल्याचं समोर आलंय. सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास केला जात आहे. सतीश वाघ असं अपहरण झालेल्या व्यक्तीचं नाव असून ते विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहेत.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आमदार योगेश टिळक यांचे मामा सतीश वाघ हे सकाळी सोलापूर रस्त्यावर असणाऱ्या हॉटेल ब्लू बेरीसमोर थांबले होते. तिथं अचानक एक चारचाकी गाडी येऊन थांबली. त्या गाडीतून उतरलेल्या दोघांनी सतीश वाघ यांनी जबरदस्तीने गाडीत बसवलं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कमी खर्चात होईल जास्त कमाई, हिवाळ्यात घ्या ही भाजीपाला पिके, Video
सर्व पहा

सतीश वाघ यांचे चौघांनी अपहरण केल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी सतीश वाघ यांच्या मुलाने पोलिसात तक्रार दाखल केलीय. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. सतीश वाघ यांचे अपहरण करून त्यांना सोलापूरच्या दिशेनं नेलं असल्याची माहिती सतीश वाघ यांच्या मुलाने दिलीय.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune : आमदाराच्या मामाचं अपहरण, हॉटेलसमोर थांबले असताना गाडीतून आलेल्या चौघांनी नेलं उचलून
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल