TRENDING:

मागणी प्रचंड, आवक थंड! चिकनपेक्षाही महाग झाला शेवगा; किलोचा दर माहितीये का?

Last Updated:

पुणे मार्केट यार्डात शेवग्याची आवक 90 टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे, घाऊक बाजारातच शेवग्याचा भाव 400 ते 500 रूपये प्रति किलो झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : सांबार आणि आमटीचा महत्त्वाचा घटक असलेल्या शेवग्याच्या शेंगांच्या दराने सध्या उच्चांक गाठला आहे. लांबलेल्या पावसामुळे सोलापूरसह दक्षिणेकडील राज्यांत झालेल्या नुकसानीमुळे पुणे मार्केट यार्डात शेवग्याची आवक 90 टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे, घाऊक बाजारातच शेवग्याचा भाव 400 ते 500 रूपये प्रति किलो झाला आहे.
शेवगा महागला
शेवगा महागला
advertisement

सोलापूर जिल्ह्यात शेवग्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. मात्र, लांबलेल्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे सोलापूरसह अनेक भागांतील शेवग्याचे पीक अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे. यामुळे यंदाचा हंगाम उशिराने सुरू होणार आहे. एरवी घाऊक बाजारात दररोज चार ते पाच हजार किलो शेवग्याची आवक होत असते. मात्र, सोमवारी केवळ ४०० ते ५०० किलो शेवगा आला. ही अल्पशी आवक फक्त आंध्र प्रदेशातून झाली आहे. त्यामुळे दरही वाढले.

advertisement

Bajra Halwa : हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाऊन कंटाळलात? बनवा टेस्टी आणि हेल्दी हलवा, पाहा रेसिपी

गेल्या आठवड्यात जो शेवगा 140 ते 150 प्रति किलो होता, तो आता थेट 500 रूपये प्रति किलोवर पोहोचला आहे. घाऊक बाजारात दहा किलो शेवग्याला 3000 चा भाव मिळत आहे. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते संघटनेचे माजी अध्यक्ष विलास भुजबळ आणि ज्येष्ठ व्यापारी रामदास काटकर यांनी ही माहिती दिली. मागणीच्या तुलनेत आवक अतिशय कमी झाल्याने ही विक्रमी भाववाढ झाली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शरिरासाठी पौष्टिक, हिवाळ्यात बनवा अंबाडीच्या फुलांची चटणी, चव अतिशय टेस्टी
सर्व पहा

पुणे आणि मुंबईतील दाक्षिणात्य उपाहारगृह चालकांकडून सांबार, रसमसाठी शेवग्याला वर्षभर मोठी मागणी असते. दररोज मोठी खरेदी करणारे हे व्यावसायिक आता वाढलेल्या दरामुळे चिंतेत आहेत. शेवगा उष्ण असल्याने थंडीत गृहिणींकडून त्याला मोठी मागणी असते. मधुमेह आणि इतर आजारांसाठी शेवगा गुणकारी असल्याने त्याचा वापर अलीकडे वाढला आहे. मात्र, या प्रचंड दरवाढीमुळे शेवग्याचा वापर करणाऱ्या गृहिणींना किमान महिनाभर हात आखडता घ्यावा लागणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
मागणी प्रचंड, आवक थंड! चिकनपेक्षाही महाग झाला शेवगा; किलोचा दर माहितीये का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल