'मिसिंग लिंक'च्या उद्घाटनाची प्रतीक्षा संपली
या प्रकल्पामुळे खंडाळा घाटातील वळणदार आणि धोकादायक रस्त्याचा त्रास कमी होणार आहे. सध्या घाटातील वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा वेळ वाया घालवावा लागतो. मात्र मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर मुंबई ते पुणे प्रवासात सुमारे 20 ते 25 मिनिटांची बचत होणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञानातून साकारलेला विशाल बोगदा
या मार्गाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे उभारण्यात आलेला भव्य बोगदा. हा जगातील सर्वांत रुंद रस्ते बोगद्यांपैकी एक मानला जात आहे. दोन्ही बाजूंनी प्रत्येकी पाच लेन असून एकूण दहा लेनचा हा बोगदा सुमारे नऊ किलोमीटर लांबीचा आहे. रस्ते वाहतुकीसाठीचा हा देशातील सर्वांत मोठा बोगदा ठरणार आहे.
advertisement
तारीख आली समोर
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा मार्ग बांधण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका कमी होणार आहे. लोणावळा घाटातील केबल-स्टेड पुलाचे कामही सध्या अंतिम टप्प्यात असून ते 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मात्र हा बोगदा वाहतुकीसाठी येत्या 1 मे रोजी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.
एप्रिल महिन्यात या मार्गाची तांत्रिक चाचणी आणि सुरक्षा तपासणी होणार आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे रोजी हा मार्ग जनतेसाठी खुला करण्याचा विचार आहे अशी माहिती एमएमआरडीएचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांनी दिली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना वेळ, इंधन आणि ताण यांची मोठी बचत होणार आहे.
