रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान हा ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकमुळे सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस आणि सोलापूर-मुंबई वंदे भारत यांसारख्या अतिशय लोकप्रिय आणि वेगवान गाड्यांच्या वेळेत बदल होणार आहे. याशिवाय नागपूर-सेवाग्राम एक्स्प्रेस, हावडा मेल आणि चेन्नई-मुंबई एक्स्प्रेस यांसारख्या लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही या ब्लॉकचा फटका बसेल. या सर्व गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा किमान १५ ते २० मिनिटे उशिराने धावतील किंवा त्यांना मुंबईत पोहोचण्यासाठी नेहमीपेक्षा अधिक वेळ लागेल, असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
advertisement
रेल्वेचा मोठा निर्णय, ठाणे-मुलुंड दरम्यान नवं स्टेशन, लाखो प्रवाशांना दिलासा
या ब्लॉकच्या काळात रेल्वे रुळांची दुरुस्ती, ओव्हरहेड वायरची देखभाल आणि सिग्नल यंत्रणेचे आधुनिकीकरण यांसारखी महत्त्वाची कामे केली जाणार आहेत. या १३ गाड्यांव्यतिरिक्त मुंबई उपनगरीय लोकलच्या वेळापत्रकातही बदल होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होऊ शकते. प्रवाशांनी स्थानकावर जाण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत मोबाईल ॲपवर किंवा चौकशी खिडकीवर गाडीचे लाईव्ह स्टेटस तपासूनच आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विशेषतः रविवारच्या सुटीनिमित्त बाहेर पडणाऱ्या आणि नोकरीनिमित्त पुण्यातून मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांनी या बदलांची नोंद घेणे आवश्यक आहे.
