महायुतीतील नेत्यांना शरद पवार गटाने आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात कोल्हापुरात समरजित घाटगे, साताऱ्यात मदन भोसले, अहमदनगरमध्ये विवेक कोल्हे या नेत्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी शरद पवार गटाकडून हालचाली केल्या जात आहेत. यातच आता हर्षवर्धन पाटील हेसुद्धा शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान, शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली. हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत शरद पवार यांची बैठक पार पडली. या बैठकीत काय चर्चा झाली ही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
advertisement
दिल्ली दारु घोटाळा प्रकरणी ED, CBI ला दणका; सुप्रीम कोर्टाकडून के कविता यांना जामीन मंजूर
माजी मंत्री आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर शरद पवार बाहेर आले आहेत. दोघांमध्ये राजकीय चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना यामुळे पुन्हा उधाण आलंय.
लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीचे अनेक नेते महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत. यात हर्षवर्धन पाटील, अकलूजचे रणजितसिंह मोहिते पाटील, पंढरपूरचे प्रशांत परिचारक, साताऱ्यातील मदन भोसले, कागलचे समरजित घाटगे आणि पुण्यातील बापू पठारे या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. आघाडीच्या नेत्यांसोबत त्यांची चर्चा सुरू आहे.