दिल्ली दारु घोटाळा प्रकरणी ED, CBI ला दणका; सुप्रीम कोर्टाकडून के कविता यांना जामीन मंजूर
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
दिल्ली दारु घोटाळा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने के कविता यांची अटी आणि शर्तींसह, १० लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका केली.
दिल्ली : दिल्लीतील कथित दारु घोटाळा प्रकरणी बीआरएस नेत्या कविता यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने १० लाखांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका केली. के कविता यांना त्यांचा पासपोर्ट जमा करावा लागेल. सुप्रीम कोर्टाने त्यांना पुराव्यांशी छेडछाडीचा प्रयत्न करू नये असं सुनावलं आहे. के कविता यांना जामीन मिळालाय. सुप्रीम कोर्टाने मनीष सिसोदिया यांनाही १८ महिन्यानंतर तुरुंगातून सोडलं.
सीबीआय, ईडीने जामीन याचिकेला विरोध करताना सर्वोच्च न्यायालयात म्हटलं की, बीआरएस नेता कविता यांनी त्यांचा फोन फॉरमॅट करण्याचा आरोप खोटा आहे. सर्वोच्च न्यायालयाने तपास यंत्रणांना विचारलं की, बीआरएस नेता के कविता गुन्ह्यात सहभागी असल्याचा काय पुरावा आहे. के कविता यांना जामीन देताना न्यायालयाने हेसुद्धा स्पष्ट केलं की, मेरिटवर कोणत्याही प्रकारची टिप्पणी केलेली नाही. यामुळे ट्रायलवर कोणताही परिणाम होणार नाही.
advertisement
बीआरएसच्या नेत्या के कविता यांच्या जामीन अर्जाच्या याचिकेवर आज सुनावणी झाली. गेल्या पाच महिन्यांपासून याचिकाकर्त्या के कविता तुरुंगात आहे. या खटल्याची सुनावणी लगेच होणंही अशक्य आहे असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने के कविता यांना जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती केवी विश्वनाथ यांच्या पीठासमोर जामीन याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने त्या पाच महिन्यांपासून तुरुंगात असल्याचं म्हटलं. ईडी सीबीआयने सिसोदिया आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याप्रमाणेच के कविता यांचाही दारु घोटाळ्यात हात असल्याचा दावा केला होता.
advertisement
के कविता यांच्यावतीने वकील मुकुल रोहतगी यांनी न्यायालयात म्हटलं की, के कविता यांच्या दोन्ही तपास यंत्रणांनी चौकशी केलीय. दोन्ही प्रकरणातील सहआरोपी मनीष सिसोदिया यांनाही न्यायालयाने जामीन दिला असल्याचा दाखला के कविता यांचे वकील मुकुल रोहतगी यांनी दिला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 27, 2024 1:33 PM IST
मराठी बातम्या/देश/
दिल्ली दारु घोटाळा प्रकरणी ED, CBI ला दणका; सुप्रीम कोर्टाकडून के कविता यांना जामीन मंजूर









