नवरात्रीच्या शॉपिंगसाठी पिंपरी-चिंचवडमधील हे मार्केट ग्राहकांसाठी खास आकर्षण ठरत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत चनिया-चोलीच्या अनेक व्हरायटी इथे उपलब्ध आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी चनिया-चोलीच्या आकर्षक व्हरायटी पिंपरी-चिंचवडच्या बाजारात उपलब्ध आहेत. रंगीबेरंगी डिझाईन्स, झगमगते दुपट्टे, ट्रेंडी स्कर्ट्स आणि पारंपरिक लूक देणारे ड्रेस यामुळे प्रत्येकासाठी काहीतरी खास आहे.
मुलींसाठी आकर्षक डिझाईन्सपासून ते मोठ्यांसाठी स्टायलिश कलेक्शनपर्यंत सगळंच स्वस्तात मिळत असल्याने खरेदीदारांची पावलं आपोआपच या मार्केटकडे वळत आहेत. नवरात्रीच्या खरेदीसाठी पिंपरी-चिंचवडच्या बाजारात कपड्यांचे दर खिशाला परवडणारे आहेत. येथे ब्लाऊज फक्त 150 रुपयापासून, स्कर्ट 350, दुपट्टा 50 तर चनिया-चोलीचा संपूर्ण ड्रेस फक्त 900 पासून मिळत आहे.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 20, 2025 10:14 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
अजून खरेदी केली नाही? पिंपरी-चिंचवड मार्केटमध्ये विकत घ्या स्वस्तात मस्त चनिया-चोली