मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुंद्राक विभागाचा अहवाल सादर झाला आहे. या अहवालात पार्थ पवारांचे नाव नाही. कंपनीचे दुसरे संचालक दिग्विजय पाटील, बिल्डर शितल तेजवानी आणि निलंबीत उपनिंबंधक रवींद्र तारुंचा अहवालात उल्लेख असून त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली होती. राज्य सरकार आणि महसूल विभागाकडून मुठे समिती सादर करण्यात आली होती. या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी तीन समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. सहनोंदणी महानिरिक्षक राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीला सात दिवसात अहवाल सादर करण्यास निर्देश देण्यात आले होते.
advertisement
विभागीय समितीला मुठे समितीचा अहवाल सादर
विभागीय समितीला मुठे समितीचा अहवाल सादर करण्यात आला असून यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण अहवालात पार्थ पवार यांना क्लीन चीट मिळाल्याची माहिती समोर आली आहे. अहवालात पार्थ पवार यांचे नाव आहे. कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आत्ता देखील अहवालात देखील पार्थ पवार यांचे नाव नाही. नव्याने कोणतेही अधिकारी या प्रकरणात नाही असे देखील अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे. गैरव्यवहार रोखण्यासाठी अहवालातून शिफारस करण्यात आली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
पुण्यातील कोरेगाव पार्कसारख्या उच्चभ्रू भागात तब्बल 40 एकर जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप आहे. बाजारभावानुसार या जमिनीची किंमत सुमारे 1800 कोटी रुपये होती, पण ती केवळ 300 कोटींमध्ये विकत घेतल्याचे समोर आले आहे. इतकंच नव्हे, तर या व्यवहारावर लागणारी सुमारे 21 कोटींची स्टॅम्प ड्युटीही काही कागदी कारवायांद्वारे माफ करून घेण्यात आली. अखेर फक्त 500 रुपयांमध्ये एवढा मोठा व्यवहार पूर्ण झाल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणात पार्थ पवारांची अमेडिया कंपनी चर्चेत आली आहे.
हे ही वाचा:
