परवानगी घेण्याची प्रक्रिया
शहरातील हरित क्षेत्राचे संरक्षण करणे आणि वाढत्या तापमानावर नियंत्रण ठेवणे यासाठी पालिकेने हे कठोर पाऊल उचलले आहे. आपल्या प्लॉट, शेत, घर किंवा बंगल्याच्या परिसरात असलेले कोणतेही झाड तोडण्यापूर्वी नागरिकांनी संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्याकडे रीतसर अर्ज करणे आवश्यक आहे. या अर्जासोबत झाडाचे फोटो, झाडाचा अहवाल आणि ते का तोडायचे आहे, याचे सविस्तर कारण नमूद करून मंजुरी घ्यावी लागते.
advertisement
Weather Alert: कोकणात हवेचा पॅटर्न बदलला, मुंबई-ठाण्यात आज काय स्थिती, पाहा हवामान अपडेट
रात्रीच्या वेळी वृक्षतोडीवर लक्ष
अनेक ठिकाणी बांधकाम व्यावसायिक, भूखंड मालक किंवा शेतकरी परवानगी न घेता झाडतोड करत असल्याच्या तक्रारी मनपाकडे येत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा सुट्ट्यांच्या दिवशी अशा प्रकारे नियमबाह्य वृक्षतोड केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन पालिकेचे पथक आता अचानक तपासणी मोहीम राबवणार आहे.
कठोर कायद्यामागील उद्देश
शहरातील झपाट्याने घटणारे झाडांचे प्रमाण रोखणे, अनियमित बांधकामांमुळे वाढणारा तापमानाचा ताण कमी करणे, पर्यावरण संरक्षण आणि जैवविविधता जपण्याचे उद्दिष्ट ठेवून मनपाने हा दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी पर्यावरणाबद्दल जबाबदार राहावे, यासाठी हे कठोर नियंत्रण आवश्यक आहे.
