अशाच काही स्टंट बाजी करणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ही तरुण मंडळी हातात बंदू घेऊन रस्त्यावर गोंगाटा करत गाडी चालवत आहेत, इतकेच नाही तर ते हवेत गोळीबार देखील करत आहेत.
या संबंधीत व्हिडीओ समोर येताच, पोलिसांनी त्यांचा तपास सुरु केला आणि अटक करण्याची तयारी केली.
हा व्हिडीओ पिंपरी चिंचवडमधील असल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे व्हिडीओ बघून कुणाचाही थरकाप उडेल. विचार करा ज्यांनी कोणी या गुंडांना असं कृत्य करताना समोरुन पाहिलं असेल त्यांची काय अवस्था झाली असेल.
advertisement
दिवसा ढवळ्या, खुलेआम हातात शस्त्र आणि बंदुका नाचविनाऱ्या या गुंडांना पोलिसांची अजिबात भीती वाटत नाही का? असा प्रश्न उपस्थित केले जात आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओ ची तपासणी करून चिखली पोलिस आणि दरोडा विरोधी पथकाने तत्काळ या गाव गुंडाना शोधून त्यांच्या मुसक्या आवळ्या आहेत.
मात्र पिंपरी चिंचवड शहरात अशा प्रकारे हैदोस घालणारा या पाच आरोपी पैकी केवळ एकच गुंड सद्या पोलिसांनी पकडलं असून त्याचं नावं कुणाल रमेश साठे असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय तर इतर गुंडांचा आपण शोध घेत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.