शहरातील स्थिती चिंताजनक
पिंपरी-चिंचवड आरटीओच्या आकडेवारीनुसार, शहरात अद्यापही १० लाखांहून अधिक वाहनांनी ही प्लेट बसवलेली नाही. ६ डिसेंबरपर्यंत केवळ ४ लाख ४० हजार वाहनांचे काम पूर्ण झाले असून, मोठ्या संख्येने नागरिक अजूनही प्रतीक्षेत आहेत. अनेक वाहनधारकांनी नोंदणी करूनही त्यांना अद्याप नंबर प्लेट मिळालेली नाही, अशी परिस्थिती समोर आली आहे.
advertisement
उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा इशारा
पिंपरी-चिंचवड आरटीओचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी स्पष्ट केलं आहे की, "१ जानेवारीपासून विना एचएसआरपी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाईल. ज्या नागरिकांनी अद्याप प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी तत्काळ अपॉइंटमेंट घेऊन नंबर प्लेट बसवून घ्यावी, अन्यथा दंड भरण्याची तयारी ठेवावी."
कशी कराल नोंदणी?
ज्या वाहनधारकांनी अजूनही नंबर प्लेट बसवलेली नाही, त्यांनी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी: १. bookmyhsrp.com या अधिकृत संकेतस्थळावर जा. २. वाहनाचा नंबर, इंजिन आणि चेसिस नंबर नोंदवा. ३. तुमच्या सोयीनुसार केंद्र आणि अपॉइंटमेंटची वेळ निवडा. ४. ऑनलाईन शुल्क भरा (दुचाकीसाठी साधारण ₹४०० ते ₹६५०, तर चारचाकीसाठी ₹८०० ते ₹१३००). ५. ठरलेल्या दिवशी गाडी संबंधित केंद्रावर नेऊन नंबर प्लेट बसवून घ्या.
