अनेकांना सोशल मीडियावर गावी जातोय, ट्रिपवर निघालोय अशा पोस्ट, स्टेटस किंवा स्टोरी टाकण्याची सवय असते. पण लक्षात ठेवा, चोर सोशल मीडियावरही नजर ठेवतात. अशा पोस्ट पाहून ते घरात कोणी नसल्याची कल्पना करून चोरीचा डाव साधतात. त्यामुळे बाहेरगावी जाताना सोशल मीडियावर अशा गोष्टी शेअर करणे टाळा.
गावी जाण्यापूर्वी काय काळजी घ्याल?
advertisement
घरातील सर्व दरवाजे, खिडक्या आणि ग्रील नीट बंद केल्याची खात्री करा. सीसीटीव्ही कॅमेरे लावा आणि ते व्यवस्थित कार्यरत आहेत का हे तपासा. शेजाऱ्यांना घर बंद ठेवून जात असल्याची माहिती द्या आणि त्यांनी लक्ष ठेवावे अशी विनंती करा. घरातील रोकड, दागिने, महत्वाची कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा.
सोशल मीडियावरील सावधानता
प्रवासाचे फोटो, व्हिडिओ किंवा लोकेशन त्वरित सोशल मीडियावर टाकू नका. असे पोस्ट घर रिकामे असल्याचे संकेत देतात. फोटो किंवा व्हिडिओ शेअर करायचे असतील तर प्रवास संपल्यानंतर किंवा घरी परतल्यानंतरच करा.
पोलिसांची तयारी आणि नागरिकांचे सहकार्य
पोलिसांनी गस्त वाढवली असून रात्रीच्या वेळी पेट्रोलिंगही सुरू आहे. तरी नागरिकांनी आपल्या परिसरात संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे. घराजवळील सीसीटीव्ही कार्यरत ठेवावे आणि सुरक्षेची जबाबदारी सर्वांनी घ्यावी.